Breaking News

शासनाकडे प्रलंबित प्रश्‍नासाठी पाठपुरावा करणार

अहमदनगर/ प्रतिनिधी : “फुलारी यांच्या कामामुळे भिंगार शहराच्या विकासासाठी भूमिकेला बळ मिळणार असून भिंगारच्या विकासात फुलारी यांनी योगदान दिले आहे. आता उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने शहराचे प्रलंबित प्रश्‍नही मार्गी लागण्यास मदत होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शासनाकडे प्रलंबित प्रश्‍नांसाठी पाठपुरावा करुन प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित प्रयत्न करु’’, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी केले आहे.
येथील कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षपदी प्रकाश फुलारी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सादीक सय्यद यांनी मोठे मन करुन फुलारी यांना साथ दिली. आपला प्रतिनिधी कॅन्टोन्मेंटमध्ये असावा असा विचार केला. मुसाजी सय्यद यांनी देखील फुलारी यांना मदत करुन भिंगारच्या विकासासाठी एकत्रित येऊन निवड केली असल्याचे यावेळी सांगितले.