Breaking News

घारगावातून रॉयल्टीपेक्षा जास्त मुरुम उत्खनन रेल्वेच्या मार्गासाठी वापर


कोळगाव/ प्रतिनिधी :
श्रीगोंदे तालुक्यात घारगाव येथे शेतकर्‍याला इनामी दिलेल्या जमिनीतून रॉयल्टीपेक्षा जास्त मुरमाचे उत्खनन करण्यात आले आहे.
श्रीगोंदे तालुक्यातून रेल्वेच्या दुहेरी मार्गाच्या लोणी ते बेलवंडी या हद्दीतील कामासाठी हे मुरुम उत्खनन करण्यात आले आहे. तालुक्यातील घारगाव येथील शेतकर्‍याला देवस्थानने इनामी दिलेल्या जमिनींमधून विनापरवाना रॉयल्टीपेक्षा जास्त मुरूमाचे उत्खनन करण्यात आले आहे.
              रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम श्रीगोंदे तालुक्यात सुरु आहे. या दुहेरी मार्गासाठी वापरण्यात येणारा मुरूम हा तालुक्यातील घारगाव गट नंबर 250 मधील शेतकर्‍याला देवस्थानने इनामी दिलेल्या जमिनीतून उत्खनन करण्यात येत आहे. या मुरुमाचे संबंधित ठेकेदाराने महसूल विभागाकडे भरलेल्या रॉयल्टीपेक्षा जास्त प्रमाणात उत्खनन होत आहे. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी देखील तालुक्यात उत्खनन सुरू झालेल्या दिवसापासून कोणत्याही प्रकारची चौकशी अथवा स्थळ पाहणी केली नसल्याचे एक अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.