Breaking News

महिलादिनी विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव


अहमदनगर / प्रतिनिधी :
जागतिक महिलादिनानिमित्त सन्मान स्त्री कर्तृत्वाचा या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा मराठी पत्रकार परिषद हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने गौरव करण्यात आला. जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी विजयामाला माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ महिला पत्रकार मिना मुनोत, न्यायाधार संस्थेच्या सचिव ॅड. निर्मला चौधरी, ॅड. विमल सुराणा, संध्या मेढे, शिल्पा रसाळ, तब्बसुम मन्सूर शेख, सहाय्यक सरकारी वकिल ॅड. मनिषा केळगंद्रे, शांतता कमिटीच्या सदस्या नलिनी गायकवाड आदी उपस्थित होत्या. स्वागत मन्सूर शेख यांनी केले. प्रास्ताविक संध्या मेढे यांनी केले. यावेळी ॅड. निर्मला चौधरी, ॅड. विमल सुराणा, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी विजयामाला माने आदींची यावेळी भाषणे झाली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते डॉ. सिमरन वधवा, यास्मिन शेख, सुनिता बागडे, मनिषा इंगळे, अरुणा गोयल, सुमेधा लोखंडे, ज्योती शिरसाठ, वैशाली टेमकर, डॉ. स्वाती रोकडे, राणी कासलीवाल, डॉ. ज्योती बिडलान, प्रियंका चिखले, रजीया दस्तेदार, निलोफर शेख, शबाना शेख, हिना शेख, उषा खोलम, शमा सय्यद, चिन्मय कुलकर्णी, मंजू भागानगरे, निवेदिता जाधव आदि विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिना शेख यांनी केले. आभार तब्बसुम मन्सूर शेख यांनी मानले.