Breaking News

जीवनाचे मोल हाच महाराजांच्या विचारांचा गाभा : महापौर

अहमदनगर/ प्रतिनिधी : “लढाया करणार्‍या राजाला यशस्वी राजा म्हणतात पण लढाया टाळून राज्य करणार्‍या राजाला रयतेचा राजा म्हणतात रक्तपातांचा मार्ग महाराजांना पटत नव्हता कारण माणसाच्या जीवनाचे मोल महाराजांच्या विचाराचा गाभा होता. शिवाजी महाराजाची राजनीती, युध्दनीती, शस्त्रनीती, गडनीती व संरक्षण सिद्धता ही अनाकलनीय होती’’,असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, श्री शिव प्रतिष्ठान, तेली समाज महासभा व मंदिर बचाव समिती यांच्या वतीने पारिजात चौक ते जुन्या बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रा.मधुसुदन मुळे, अशोक सरनाईक, सुनील कुलकर्णी, शोभा ढेपे, माधुरी जानवे, जिल्हा युवा अध्यक्ष सुनील महाजन, शहर जिल्हाध्यक्ष संकेत होशिंग, कन्हैय्या व्यास, प्रसन्न खाजगीवाले, माधवी कुलकर्णी, अशोक जोशी, राजकुमार जोशी, बाळासाहेब अनासपुरे, शिरीष जानवे, समीर पाठक, कृष्णा जोशी, मल्हार गंधे, श्रृती देशमुख, शिव प्रतिष्ठानचे बापूसाहेब ठाणगे, तेली समाज महासभेचे हरीभाऊ डोळसे, राजेश सटाणकर आदी उपस्थित होते.
पारिजात चौक, प्रोफेसर कॉलनी, प्रेमदान चौक, झोपडी कॅन्टीन, पत्रकार चौक, लालटाकी, दिल्लीगेट, नवीपेठ, माणिकचौक, आशा टॉकीज रोड, शनिचौक, जुने महानगरपालिका, माळीवाडा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गे दुचाकी रॅली काढण्यात आली होती. दुचाकी रॅलीचा समारोप जुन्या बसस्थानकाजवळील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ठिकठिकाणी या रॅलीस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. महापौर बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे, माजी आमदार अनिल राठोड, मयुर बोचूघोळ, किशोर बोरा, संजय चोपडा, घनशाम घोलप, संभाजी कदम, गणेश कवडे, अभय आगरकर आदीनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.