Breaking News

जिल्हा परिषदेची शाळा झालीय डिजिटल!


अहमदनगर / प्रतिनिधी :
ग्रामपंचायतच्यावतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून दिले गेलेले संगणक, एलईडी टीव्ही संच आणि लोक सहभागातून प्राप्त झालेले संगणक, लॅपटॉप, एलईडी टीव्ही संच,प्रिंटर तसेच सीसीटीव्ही कॅमेरे या आधुनिक तंत्रज्ञान युक्त शैक्षणिक साहित्यामुळे नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील जिल्हा परिषद शाळा डिजीटल झाली. त्यामुळे या शाळेत आता विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत अध्यापन केले जात आहे.
या डिजीटल क्लासरूमचे आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे, यासाठी शाळेत उभारलेल्या हँडवॉश स्टेशनचे उद्घाटन सरपंच आरती कडूस, उपसरपंच जयप्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमन इंदूताई गोडसे, ग्रा. पं. सदस्य गजानन पुंड, शिलाताई कडूस, बाजार समितीचे निरीक्षक संजय काळे, निवृत्त पोलिस निरीक्षक पोपटराव कडूस, माजी सरपंच भानुदास धामणे, आबासाहेब काळे, नानाभाऊ कडूस, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतिष कडूस, पत्रकार सुनिल हारदे, आरोग्य सेविका वर्षा धामणे, राजेंद्र कडूस, भैय्या कडूस, संतोष काळे, संतोष पाटील, सतिष कडूस, शकील शेख, महमद इनामदार आदींसह ग्रामस्थ, महिला पालक उपस्थित होते. सारोळा कासार ग्रामपंचायतने १४ व्या वित्त आयोगाच्या वार्षिक आराखड्यात गावातील शाळांसाठी भरीव तरतूद केलेली होती. त्यातून गावातील सर्व प्राथमिक शाळा, अंगणवाड्या यांना संगणक संच ४२ इंची स्मार्ट एलईडी टीव्ही संच देण्यात आले आहेत. या शिवाय सारोळा गावठाण येथील शाळेत लोकसहभागातून एक संगणक ४० इंची स्मार्ट एलईडी टीव्ही संच, लॅपटॉप,प्रिंटर तसेच सीसीटीव्ही कॅमेरे प्राप्त झाले आहेत. या आधुनिक साहित्यामुळे संपूर्ण शाळा डिजीटल झाली आहे. मुख्याध्यापिका सुनिता लांडगे- काळे, यांच्यासह उपक्रमशील शिक्षक रमजान शेख, ज्योती धामणे, बाबासाहेब धामणे, सविता लोंढे यांनी शाळेचा चेहरा मोहरा बदलला असून त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वीच पुढील शैक्षणिक वर्षासाठी या शाळेत आपल्या मुलांचे प्रवेश घेण्यासाठी नागरिक संपर्क करत आहेत.