Breaking News

पोलीस ठाण्यातच उपनिरीक्षकाने घेतला गळफास


यवतमाळ : यवतमाळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे साहायक पोलीस उपनिरीक्षक राजू उईके यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. काल रात्री उशिरा त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. राजू उईके हे गुन्हे शाखेत कार्यरत होते. सकाळी काही पोलीस शिपाई त्यांच्या कक्षात गेले तेव्हा त्यांना उईके हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
............................................................