Breaking News

कोरोना'चा रुग्ण शोधणारा सी सी टी व्ही कॅमेरा दाखल


अहमदनगर / प्रतिनिधी :
कोरोना सारख्या भयंकर रोगाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. या रोगामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण असून भारतातही कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतातदेखील कोरोनाचे रुग्ण शोधण्यास सुरुवात झाली असून यंत्रणा अपुरी पडते आहे. कोरोना रोगावर जरी अजून लस सापडली नसली तरी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णास शोधण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. कोरोनाचे रुग्ण शोधणारा सी सी टी व्ही कॅमेरादेखील बाजारात दाखल झाला आहे. थर्मल सेन्सरद्वारे हा  कॅमेरा समोरून जाणाऱ्या व्यक्तीचे तापामान मोजतो. दहूआ को विड - पी असे नाव या कॅमेरास देण्यात आले आहे. हा कॅमेरा नगरमध्ये दाखल झाला असून सी सी टी व्ही आणि होम सिक्युरिटी विषयात प्रसिद्ध असलेले नगरमधील दहूआ कंपनीचे जिल्हा वितरक मंदार मुळे यांच्याकडे हा कॅमेरा उपलब्ध आहे.
जगभरातील अनेक देशांनी आपल्या देशातील विविध भागात हा कॅमेरा बसविणे सक्तीचे केले आहे. विमानतळ, बसस्थानक रेल्वेस्थानक, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये, शासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना, कंपन्या क्रीडा संकुल  तसेच गर्दीच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाऊ शकतात. याद्वारे साथीच्या रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रणास करण्यास  मदत होणार आहे.   या कॅमेराद्वारे प्रत्येक व्यक्तीचे तापमान मोजण्यासाठी फक्त तीन सेकंदाचा वेळ लागतो. त्याची अचूकता . अंश टक्के इतकी आहे. कोरोना व्हायरस अधिक गतीने आणि व्यापक प्रमाणात शोधण्यासाठी हे प्रभावी तंत्रज्ञान असून नगरमध्ये शाळा महाविद्यालये, कंपन्या आणि गर्दीच्या ठिकाणी कॅमेरा बसविणे आवश्यक आहे. या संदर्भात अधिक माहिती तसेच कॅमेरा उपलब्धतेबद्दल मंदार मुळे ९८२२२९४६२२ यांच्याशी संपर्क साधावा.