Breaking News

घरफोड्या करणारी टोळी एलसीबीने केली जेरबंद


अहमदनगर / प्रतिनिधी :
शहरात घरफोड्या करणारी टोळी चार जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच जेरबंद केली. या कारवाईत ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत समीर खाजा शेख (वय- २२ वर्षे, रा. सबजेल चौक, नगर), परवेज मेहमूद सय्यद (वय- १९ वर्षे, रा. भांबडगल्ली, भोसले आखाडा, अ.नगर), गणेश उर्फ गौतम संजय भंडारी (वय-२० वर्षे, रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहमदनगर) यांना अटक करण्यात आली.
दि. १० रोजीचे रात्री फिर्यादी सलीम अलीम अन्सारी (रा. कानडे मळा, सारसनगर, अ.नगर) यांचे सारसनगर रोडवरील भाजी मार्केट समोरील सौरभ बेकर्स पॉईंट हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानामधील तीन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ५५ हजार रुपये किंमताचा ऐवज चोरटयांनी चोरुन नेला. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिलीप पवार हे त्यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मदतीने गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदारांकडून त्यांना माहिती मिळाली, की सदरचा गुन्हा हा समीर शेख, रा. सबजेल चौक, अहमदनगर याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केला आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे स. फौ. सोन्याबापू नानेकर, पो. हेकॉ. मनोहर गोसावी, विजय वेटेकर, पो. ना. रविन्द्र कर्डीले, सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश वाघ, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, सागर सुलाने यांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या आरोपींकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी ५ हजार ५०० रुपये किंमतीचे दोन मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली ५० हजार रुपये किंमतीची बिगर नंबरची सुझूकी ऍक्सेस मोटार सायकल असा एकूण ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.