Breaking News

खडतर वाटेवरून सक्षमपणाचा प्रवास

शोधते संपेल हा शापित नूपुरे, केवळ स्त्री होण्याचा काळ लोपेल पून्हा हाडा मासाचा माणूस म्हणून बघतील केव्हा? सांग ना, लपून राहू कोठे? गर्भात सुद्धा जगवणार नाही मग तुमच्या महाली जन्म घेऊ केव्हा? मी कामिनी नाही, मोहिनी नाही,.. तुझ्या हृदयातली आहे मी स्वामींनी पण स्त्री आहे म्हणून वादळांवर प्रेम करायला शिकले  तरी जन्म घेऊन वाटते केला आहे मी गुन्हा ! बुलंद झुंज घेईन जेव्हा होईल हमला  झुंज देईल वादळाशी. फ़क्त माणुसकीची साथ पाहिजे  अवघ्या जगाचे वैर.. सोसेन कसे, प्रत्येक बलात्कारानंतर जगण्याआधी जाळून मारती..

स्त्री म्हणजे सुंदर नाजूक -वेल असते. अशी उपमा खूपदा ऐकून स्त्रियांना आपण किती अवलंबून आहोत याचा भास होते. वेलीला आधाराची गरज असते. वेल जसे वाढत जाते. ती आधाराच्या अपेक्षेने चहुबाजूने शोधू लागते. इतक्यात कुणी हळवा आधार दिला की, झोकून देते त्याच्या खांदयावर स्वतःचा भार. यात खूपदा प्रेमाने गोंजारने, समजून घेणे, वरवर का होईना रिस्पेक्ट दाखवणे, डेटिंग, रोमान्स दिसलं की, स्वतःला गुंडाळून घेते त्याच्या खांबाला. पण, वेल ही कमजोर करणारी शब्दावली पुसून काढले तर, स्वतःच मजबूत खोड तिने बनावं. जमिनीवर पसरून वेल निवांत जगू शकते. र्एिींरश्रळीूं ीींरीीं षीेा ेपश’ी हेाश, ींहरीं वे पेीं लू ारज्ञश ारीींशी’ी र्लीीं लू ेुप ळपवशशिपवशपीं ीर्शीेंर्श्रीींळेपरीू ुेाशप, ुहे हरी पेींहळपस ीें श्रेेीश र्लीीं ींहशळी लहरळीी. अर्थात ज्या प्रकारे उदारता आपल्या घरापासून सुरु होणे आवश्यक आहे. तसेच समानतेचा धडा सुद्धा आपल्या कुटुंबापासून सूरु व्हायला पाहिजे. 8 मार्च ’ जागतिक महिला दिन ’ का साजरा केला जातो ? या दिवसाचे खास महत्व काय? याचा इतिहास प्रत्येक स्त्रीने जाणून घ्यावे. कार्यक्रमात मिरवायचं, पार्ट्या करायचं, धुमधडाका करायचं या पलीकडे हा दिवस वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करावं. जेणेकरून मी स्त्री आहे याचा अभिमान खर्‍या अर्थाने प्रत्येकाला वाटायला हवे. ज्या स्त्रियांनी या दिवसासाठी संघर्ष केलाय त्यांचे नाव देखील आपल्याला माहिती नाही.
उच्चभ्रू, श्रीमंत घरातील महिला स्वतःचा लढा लढून घेतात. स्वतःच अस्तित्व तयार करतात. पण धुनी-भांडी करणारे, शेतमजूर, ऊसतोड महिला, काच कागद पत्रा गोळा करणार्‍या, कामगार स्त्रिया स्वतःसाठी लढू शकत नाही. चहुबाजूने त्यांची कोंडी होते. सध्या बाजार पेठेची गावे, उद्योग नगरी अश्या ठिकाणी मजूर अड्डे निर्माण होत असून त्या ठिकाणी सुद्धा महिला रोजगारासाठीउभ्या असतात. अनेक महिला बांधकाम कमगार, वीटकामगार, दगड फोडणारे, लाकूडफाटा तोडणार्‍या, शेत मजूर,उसतोड कामगार कंपनीत जडकाम करणार्‍या महिला या अति श्रमाची कामे करत असतात.  परंतु त्या ठिकाणी पुरुषांच्या मानानेकमी दरात महिला कामाला मिळतात . शिवाय त्यांची संघटना नसते याचा फायदा हा त्या ठेकेदाराला होत असतो त्यामुळेया महिला वर्षांनुवर्ष पीडित राहतात एकीकडे झगमगाटाच्या दुनियेत उच्चब्रू महिला जागतिक महिला दिन साजरा करतात परंतुअस्या महिलांची त्यांना कोणतीच आठवण होत नसते. त्या साठी पुढे येत नाहीत . आर्थिक आधार, मानसिक आधार, अशिक्षित पणा यामुळे अन्यायाला तोंड दयायला घाबरतात. निदान यांच्यात जागृती करुन त्यांना आरोग्य, आर्थिक भार याविषयी काहीतरी सांगायचे पाऊल का उचलत नाही?  शिक्षणाचा अधिकार, विधवा पुनः विवाह, देवदासी प्रथा, बालविवाह अशा विषयाला लक्ष देऊन अवेरनेस ठेवायला, ठामपने उभं राहावं ही हिंमत आपण का बनू नये. हुंडाबळी सारखे तर अनेक प्रथा अजूनही सुरु आहे. आर्थिक अडचणीमुळे केवळ स्त्री देह विकून व्यवसाय करणे उपाय नाही. ओढवून नेलेल्या स्त्रियांना सुद्धा त्या नर्कातून सुटायचं मार्ग सापडावं. स्वतःच्या तब्बेतीला कसं जपता येईल याची धडे द्यावे इतर व्यवसाय कसं उभं करायचं. गव्हर्नमेंट स्कीम स्त्रियांसाठी किती आहेत याची कल्पना देण्यात थोडी भर घालता येऊ शकते.
देवदासी ची संख्या सुशिक्षित घराण्यात सुद्धा आढळून येत आहे. दक्षिण भारतात सर्वात अधिक देवदासी चे प्रमाण आढळले. तामिलनाडू सरकारने सन 1930 मध्ये कायदा अमलात आणले होते. विषमताहीन, शोषणविहीन मानवी जीवन असायला पाहिजे. जिथे ती उपभोग साधन , लिंगभेद म्हणून क्रूर पद्धतीने कधी गर्भात, गर्भाच्या बाहेर तिला खुडल्या जाऊ नये.  अनेक बाबतीत संस्कारांची बाजू कमी पडू लागल्याने व अनैतिक संबधातून स्त्रिया कडून गुन्हे घडू लागले आहे. म्हणजे स्त्रिया कशातच मागे राहिले नाही. स्वतंत्रपणा चा फायदा सगळ्याच पद्धतीने केला जात आहे. पण मनातले परंपराच्या बेडया मात्र तोडत नाही. मासिक पाळीमध्ये, ’मेन्स्ट्रु  हट ’ पासून तर, अनेक नियमाला बांधून स्वतःला व आपल्या लेकीला त्रस्त करुन सोडतात. आपल्या घरात आपल्या लहान लेकराला कोण करुन वाढेल? पिण्यासाठी पाणी कोण घेणार? अपशकुन होते म्हणून साध्या नववा महिना लागलेल्या स्त्रियांना पूर्वतयारी करायला डॉक्टर सांगतात पण आपण ते करत नाही. अगदी वेळेवर काही सापडेल याची ग्यारंटी नसते. म्हणून ब्यागा मध्ये आवश्यक ते स्वच्छ, मऊ निर्जंतुक  कपडे, बांधायला स्कार्प, पैसे, बरेच वस्तू ठेवायचे असतात. नोकरीं करणार्‍या जवळ बाळ जन्म घेतपर्यंत सोबत कुणीच नसते. पण बायकाच म्हणतात, मासिक पाळी व बाळ होण्याआधी पूर्वतयारी म्हणजे अपशकुन अशीपूर्वी अंधश्रद्धा समाजात होती ती आता नाहीशी होत चालली आहे. हा सकारात्मक बदल प्रतिपथावर घेऊन जाणारा आहे.
सर्वं भेदाच्या पलीकडे गेलेला निरोगी, निस्वार्थी, माणुसकीने,  प्रेमाने नटलेला समाज तयार करू शकते इतकी ताकत त्या स्त्री मध्ये आहे. महिला आपआपसात द्वेष करत असतील तर महिला दिवस नावापुरती आहे.  स्त्रीच्या जीवनाला प्रवाहाचे रूप येऊ लागला आहे. तिची गोठलेली मने वितळून प्रवाही होतांना दिसते आहे. पण नको तिथे आत्मविश्‍वास अतिप्रमाणात डोक्यावर घेऊन स्वतःवर संकट सुद्धा ओढवून घेत आहे. स्त्री   सर्वात जास्त अंधश्रद्धा, मानसिक आजाराला ग्रासलेली दिसते. बुवाबाजी करण्यात स्वतःचे दोष लपवले जातात. तरुण मुलीला त्या बुवाकडे नेणारी स्त्री असते. प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करते. तिच्याशी र्ाीश्रींळींरीज्ञळपस स्किल वर गर्व आहे. पण फ़क्त यश गाठून आपण जिंकलो हे दाखवताना मनाच्या बेड्या कितपत तोडले आहे? ती आज सर्व क्षेत्रात खंबीरपणे उभी आहे. आधुनिक करणाबरोबर स्त्रीचा सक्षमपणाचा प्रवास सुरु झाला आहे. तीला समाज्याची साथ हवी आहे.प्रा. प्रिया मेश्राम
मो. 8208502161