Breaking News

महासत्ता अमेरिकेने कोरोनापुढे अखेर नांग्या टाकल्या


डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांनंतर अमेरिकेत राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीची घोषित केली. तसेच सर्व राज्यांना त्वरित कठोर खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगितले गेले आहे. ट्रम्प म्हणाले की, मी अधिकृतपणे देशात आपत्कालीन स्थिती जाहीर करतो. यूएस राज्यांमधील कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला ट्रम्प प्रशासनाकडून 50 अब्ज डॉलर्स देण्यात येतील. दुसरीकडे जगभरात कोरोना व्हायरसचे एकूण 1 लाख 45 हजार 634 प्रकरणे समोर आली आहेत. शनिवार सकाळपर्यंत एकूण 5436 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्रपतींनी राज्यांना आवाहन केले की, सर्व राज्यांनी या संकटाच्या वेळी कोरोनाव्हायरसशी सामना करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्ही राज्यांना 50 अब्ज डॉलर्सचा निधी जारी करीत आहोत. एक राष्ट्रीय डेटा सेंटर आणि स्पेशल युनिट तयार केले गेले आहे. यातून संपूर्ण देशाचे निरीक्षण केले जाईल. या महामारीपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकन सरकार प्रत्येक पावले उचलली आहेत  शुक्रवारी रात्रीपर्यंत अमेरिकेत कोरोना व्हायरसचे एकूण दोन हजार प्रकरणे समोर आली आहेत. तर आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी परदेशातील जहाजांना अमेरिकन बंदरांवर येण्यास बंदी घातली आहे. मेक्सिको आणि इतर देशांच्या सीमेवर उच्च थर्मल स्कॅनर बसवण्यात आले आहेत. अमेरिकन सैन्याच्या विशेष वैद्यकीय युनिटलाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सतर्क राहण्यास सांगितले आहे. जगावर सत्ता गाजवणार्‍या महासत्ता अमेरिकेने कोरोनापुढे अखेर नांग्या टाकल्या असल्याचे सिध्द झाले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांनंतर अमेरिकेत राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीची घोषित केली. तसेच सर्व राज्यांना त्वरित कठोर खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगितले गेले आहे. ट्रम्प म्हणाले की, मी अधिकृतपणे देशात आपत्कालीन स्थिती जाहीर करतो. यूएस राज्यांमधील कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला ट्रम्प प्रशासनाकडून 50 अब्ज डॉलर्स देण्यात येतील. दुसरीकडे जगभरात कोरोना व्हायरसचे एकूण 1 लाख 45 हजार 634 प्रकरणे समोर आली आहेत. शनिवार सकाळपर्यंत एकूण 5436 लोकांचा मृत्यू झाला आहे.तसेच अमेरिकेचे राष्ट्रपतींनी राज्यांना आवाहन केले की, सर्व राज्यांनी या संकटाच्या वेळी कोरोनाव्हायरसशी सामना करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्ही राज्यांना 50 अब्ज डॉलर्सचा निधी जारी करीत आहोत. एक राष्ट्रीय डेटा सेंटर आणि स्पेशल युनिट तयार केले गेले आहे. यातून संपूर्ण देशाचे निरीक्षण केले जाईल. या महामारीपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकन सरकार प्रत्येक पावले उचलली आहेत  शुक्रवारी रात्रीपर्यंत अमेरिकेत कोरोना व्हायरसचे एकूण दोन हजार प्रकरणे समोर आली आहेत. तर आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी परदेशातील जहाजांना अमेरिकन बंदरांवर येण्यास बंदी घातली आहे.
मेक्सिको आणि इतर देशांच्या सीमेवर उच्च थर्मल स्कॅनर बसवण्यात आले आहेत. अमेरिकन सैन्याच्या विशेष वैद्यकीय युनिटलाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सतर्क राहण्यास सांगितले आहे. करोना विषाणूचा अतिशय वेगात होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील देश कंबर कसून उभे ठाकले असताना दहशत निर्माण केलेल्या या साथीने अमेरिकेसारख्या महासत्तेला आणीबाणी घोषित करण्यास भाग पाडले आहे. शंभरहून अधिक देशांमध्ये पसरलेल्या या साथीची सुमारे एक लाख 30 हजारहून अधिक लोकांना बाधा झाली आहे.अमेरिकेबरोबर चाललेल्या व्यापारयुद्धामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांचे चीनवरील अवलंबित्व कमी करीत आहेत. त्यामुळे पुरवठादारांची मोठी फळी असणे किती गरजेची आहे, हे ‘करोना‘मुळे उद्भवलेल्या संकटामुळे प्रकर्षाने दिसले आहे. चीनने राबविलेल्या उपाययोजनांमुळे हुबेई प्रांतातील ‘करोना‘चा प्रसार बर्‍यापैकी आटोक्यात आला. चीनसारख्याच उपाययोजना इटली आज राबवित आहे. अनेकांना अनेक आठवडे विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. सामाजिक स्तरावर एकमेकांपासून योग्य अंतर ठेवून राहण्याच्या उपाययोजना साथीच्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात योग्य असतात, असे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे इलियास मोसिआलोस सांगतात. चीनमध्ये सुरुवातीला यापैकी काहीच केले गेले नाही. सामूहिक कार्यक्रमांवर बंदी, लोकांच्या फिरण्यावर बंदी, औषधनिर्मिती आणि वितरणावर नियंत्रण, नागरिकांवर पक्षकार्यकर्त्यांनी ठेवलेली नजर हे चीनने योजलेले उपाय स्तुत्य आहेत. पण, याच काळात नोकरी जाण्याच्या भीतीमुळे अनेक ‘करोना‘ग्रस्तांची नोंदणीच करण्यात आली नसल्याची भीती व्यक्त होत आहे.  स्पेनमध्ये करोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी पुढील दोन आठवड्यांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कारण, इटलीनंतर या विषाणूची सर्वाधिक लागण स्पेनमध्ये आहे. सध्या येथे चार हजारहून अधिक रुग्ण आढळले असून आठवडाभरात तेथील रुग्णांच्या संख्येत सातपट वाढ झाली आहे आणि 120 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीतील भीषण परिस्थिती सर्वांना धक्का देऊन गेली आहे. युरोपनंतर आखाती देशांनीही खंबीर पावले उचण्याचा इरादा व्यक्त केला आहे. ‘करोना‘ने हाहाकार उडवलेल्या इराणच्या जवळ असलेल्या सौदी अरेबियाने देशात येणार्‍या विमान सेवांना स्थगिती दिली आहे.
इराणमध्ये 11 हजारहून अधिक लोकांना संसर्ग होऊन 500हून अधिक जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे लोकांनी घराबाहेर पडू नये आणि कार्यालयीन कामदेखील घरूनच करावे, अशा सूचना संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये देण्यात आल्या आहेत. तर अबूधाबीमध्ये मार्च महिनाअखेरपर्यंत नाइट क्लब, रेस्तराँसारखी सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. जगात सुमारे पाच हजारहून अधिक जणांचा मकरोनाफचा संसर्ग झाल्याने बळी गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आणि कल्पनेपेक्षा अधिक वेगाने पसरणार्‍या या साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी सुमारे 50 अब्ज डॉलरच्या निधीची तरतूदही केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल खुलासा केला की मही परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. येते आठ आठवडे कळीचे आहेत. या कालावधीत मसरकारच्या सर्व यंत्रणांना आपल्या संपूर्ण शक्तींनिशी कार्य करता यावे यासाठी आपण राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी संस्थांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या कर्जावरील व्याज माफ करण्याचीही घोषणा करीत ट्रम्प यांनी अल्प दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आणीबाणी घोषित केल्याने अशा स्वरूपाच्या राष्ट्रव्यापी आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी अमेरिकेतील ‘फेडरल इमर्जन्सी एजन्सी‘ला विविध राज्यांशी समन्वय साधता येतो आणि स्थानिक सरकारांना मदत करता येते.
अमेरिकेतील 50 पैकी 46 राज्यांत ‘करोना‘ने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. तेथे अन्य युरोपीयन देशांच्या तुलनेत कमी म्हणजे सुमारे दोन हजार ‘करोना‘बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र ही परिस्थिती चिघळू नये म्हणून वेळीच त्याबाबतचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय हा आततायीपणाचा अथवा अनावश्यक भीती निर्माण करणारा वाटू शकतो. परंतु अमेरिकन जनतेच्या स्वभावप्रवृत्तीकडे पाहता ही आवश्यक बाब ठरते. कारण, आपल्याला वाटते तसे अमेरिकन हे अजिबात जागतिक घडामोडींशी संबंधित नसतात. त्यांचे अमेरिकाव्यतिरिक्त जगाबद्दलचे भान अगाध असते. तुम्ही कोणत्या देशाचे आहात हे दहापैकी अकरा अमेरिकन लोकांना सांगूनही कळत नाही, असे तेथे गमतीने म्हटले जाते. कारण त्यांना जगाची माहिती करून घेण्याची गरज नाही. बाकीचे जग अमेरिकेवर अवलंबून आहे, ते जगावर अवलंबून नाहीत. मात्र रोगाच्या साथी आणि मकरोनाफ ने ज्या वेगात जगभरात उच्छाद मांडला आहे ते पाहता तेथील निद्रिस्त जनतेला जागे करण्यासाठी आणीबाणी घोषित करणे ट्रम्प प्रशासनाला आवश्यक वाटले. तसेच आरोग्याच्या बाबतीत जागरूक आणि काहीशा अतिजागरूक आणि भयग्रस्त असणार्‍या अमेरिकनांसाठी आजाराचे गांभीर्य दाखवून देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात खर्च करणार्‍या आपल्या नागरिकांसाठी मोठ्या निधीची तरतूद करणेही तितकेच आवयश्क होते. या घोषणेनंतर तेथे या रोगाच्या प्रसारास आळा बसण्यास मदत होऊ शकते. युरोप, अमेरिका आणि आखाताव्यतिरिक्त अन्य देशही कोणतेही अघटित घडू नये साठी तातडीने पावले उचलत आहेत. रशियाने नॉर्वे आणि पोलंडला जोडणार्‍या सीमा बंद केल्या आहेत. खासगी, व्यावसायिक दौरे, अभ्यास दौरे आणि पर्यटन अशा कोणत्याही कारणांसाठी प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. व्हेनेझुएलात करोनाचा रुग्ण आढळल्यानंतर कोलंबियाने व्हेनेझुएलाकडची सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला. नेपाळनेही पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने घोषित केलेल्या आणीबाणीने तेथील जनतेबरोबर अन्य देशही या साथीच्या प्रसाराला रोखण्यासाठीच्या प्रयत्नाना वेग देतील, यात शंका नाही.