Breaking News

आता पोलिसांची तंबाखूविरोधी कारवाई मोहिम! 'कोटपा' कायद्याचे खास प्रशिक्षण


अहमदनगर / प्रतिनिधी :
कोठेही सर्रास होणारे धूम्रपान तसेच तरुणांमधील वाढत्या व्यसनाचे दुष्पपरिणाम लक्षात घेता अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर पोलिसांनी कोटपा कायद्यानुसार विशेष कारवाई मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक धूम्रपान आणि शाळा- कॉलेजजवळ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांविरुद्ध सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई करण्यात येते. त्याचे खास प्रशिक्षण शुक्रवारी पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध हेल्थ फाऊंडेशनचे राज्य व्यवस्थापक देविदास शिंदे यांनी दिले.
यावेळी कोटपा कायद्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. नगरमधील मॅक्सकेअर रुग्णालयाचे कर्करोगतज्ञ् डॉ. सतीश सोनवणे यांनी तंबाखूमुळे होणाऱ्या आजाराबत आणि त्याच्या परिणामांबाबत पोलिसांना मार्गदर्शन केले. त्यानंतर नगर शहर पोलिसांनी कोटपा कायदा कारवाई मोहीम घेण्यात घेतली. बसस्थानकाबाहेर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, शाळा- महाविद्यालय परिसरात लहान मुलांना सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे, कोटपा कायद्यानुसार आवश्यक सूचना फलकांची पूर्तता करणे, अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे अशा लोकांवर कोटपा कायदा कलम आणि कलम (), () नुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार आहे. विशेषतः शाळा- महाविद्यालय परिसरातील कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.
५० टक्के कॅन्सर तंबाखू सेवनामुळे
नगर पोलिसांनी आपले शहर तंबाखूमुक्त  करण्यासाठी जे पाऊल उचले आहे, त्याचे प्रथमतः स्वागत. कोणत्याही प्रकारातील तंबाखूचे व्यसन प्रत्येकाच्या आरोग्याला घातकच असते. महाराष्ट्रात वर्षाला ७२ हजार लोक तंबाखूचे बळी ठरतात. ही बाब खूपच चिंताजनक आहे. तंबाखूपासून आपल्या पिढीला, मुलांना दूर ठेवल्यास हा आकडा आपण कमी करू शकतो. तंबाखू विरोधी कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास हा आकडा टाळणे शक्य आहे.
डॉ. सतीश सोनवणे, कर्करोग तज्ञ.
लहान मुले आणि तरुण हे आपल्या राष्ट्राची संपती आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे तंबाखू व्यसनापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. तंबाखूविरोधी कोटपा कायद्याच्या नियमित कारवायांचा चांगला परिणाम दिसून येतो. केरळ आणि कर्नाटक राज्यात शिक्षण विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवायांमुळे तांबाखुच्या वापरकर्त्यांमध्ये घट दिसून आली.
निमेश सुमती, प्रतिनिधी, केअरिंग फ्रेंड्स.
काय आहे कोटपा कायदा?
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम- नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. तर कलम- ( ) नुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थानच्या संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहेत. या कायदयानुसार २०० रुपये चलन पावती दंड किंवा बाल न्याय कायदा २०१५ नुसार लाख रुपये आणि वर्षाची शिक्षची तरतूद करण्यात आली आहे. बाल न्याय कायदा कलम ७७ नुसार कारवाई  करणारे महाराष्ट्र हे पाहिले राज्य आहे.