Breaking News

‘अशोक’ च्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता

अशोकनगर/ प्रतिनिधी : “अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20 च्या 63 व्या गळीत हंगामात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 लाख 98 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करण्यात येऊन यंदाच्या गळीत हंगामाची सांगता शुक्रवारी (दि.6) झाली’’, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ, व्हा.चेअरमन पोपटराव जाधव यांनी दिली.
अशोक कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी चेअरमन भाऊसाहेब कहांडळ, व्हा. चेअरमन पोपटराव जाधव, कारखान्याने माजी चेअरमन सुरेश गलांडे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, संचालक दत्तात्रय नाईक, बापूराव त्रिभुवन, नितीन बनकर, पुंजाहरी शिंदे, बबन मुठे, दिगंबर तुवर, अभिषेक खंडागळे, अच्युतराव बडाख, कारेगाव भागचे संचालक नारायण बडाख, काशिनाथ गोराणे, माणिकराव पवार, शिवतेज धुमाळ, कामगार संचालक गोरख चिडे, पोपट फासाटे, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, कार्यालय अधीक्षक आप्पासाहेब दुशिंग यांचे हस्ते गव्हाणीत मोळी टाकून हंगामाची सांगता झाली.
यावेळी कारखान्याचे अधिकारी बाळासाहेब उंडे, नारायण चौधरी, संभाजी झाडे, नीलेश गाडे, राजेंद्र बनकर, लव शिंदे, कृष्णकांत सोनटक्के, नानासाहेब लेलकर, सुनील चोळके, अनिल कोकणे, आण्णासाहेब वाकडे, रमेश आढाव, विलास लबडे आदींसह कामगार उपस्थित होते.
अशोक कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखान्याचे सभासद, उस उत्पादक, अधिकारी, कामगार, उस तोडणी कंत्राटदार, उस तोडणी मजूर, उस तोडणी यंत्रचालक, उस वाहतूकदार, व्यापारी व हितचिंतकाचे सहकार्य लाभल्याबद्दल कारखान्याचे सूत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे, चेअरमन भाऊसाहेब कहांडळ, व्हा.चेअरमन पोपटराव जाधव, संचालक मंडळाचे सदस्य, कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी आभार मानले.