Breaking News

मराठी अस्मितेशी खेळणे थांबवा

घराघरात पाहिली जाणारी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या दशकभरापासून लोकांचं मनोरंजन करत आहे. छोट्या मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींच्या पसंतीमुळं ही मालिका टीआरपीच्या यादीत सुद्धा टॉप आहे. केवळ हिंदी भाषिक नव्हे तर इतर भाषिकही ही मालिका आवडीनं पाहतात. मुंबईतल्या गोरेवात परिसरातील काल्पनीक अशा पावडर गल्लीतल्या गोकूळधाम सोसायटीभोवती फिरणारी ही मालिका असल्यानं मराठी भाषिक प्रेक्षकांना ही मालिका अधिक भावते आहे. समाजात घडणार्‍या प्रत्येक घडामोडींना मालिकेतून हलक्या फुलक्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येतं. त्यामुळं मालिकेचं विविध स्तरातून कौतुक झालं आहे.  छोट्या पडद्यावरील ही मालिका वादात सापडली आहे. मालिकेतून मनोरंजन करत सामाजिक भान जपणार्‍या या मालिकेत चुकीची माहिती दाखवत मराठी भाषेचा अपमान केला केला असून मालिकेतील काही संवादावर सब टीव्ही आणि मालिकेतील निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहेे.भविष्यात कुणी मराठी भाषा, मराठी अस्मिता यांच्याशी खेळ करणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे मराठी भाषा, मराठी माणूस यांची उपेक्षा करण्याची ही साथ वेळीच रोखली नाही तर भविष्यात हे अतिक्रमण वाढत जाईल आणि मराठी भाषा व समाजाच्या पुरते मूळावर उठण्याची शक्यता आहे. 


 घराघरात पाहिली जाणारी मतारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या दशकभरापासून लोकांचं मनोरंजन करत आहे. छोट्या मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींच्या पसंतीमुळं ही मालिका टीआरपीच्या यादीत सुद्धा टॉप आहे. केवळ हिंदी भाषिक नव्हे तर इतर भाषिकही ही मालिका आवडीनं पाहतात. मुंबईतल्या गोरेवात परिसरातील काल्पनीक अशा पावडर गल्लीतल्या गोकूळधाम सोसायटीभोवती फिरणारी ही मालिका असल्यानं मराठी भाषिक प्रेक्षकांना ही मालिका अधिक भावते आहे. 18 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सुरु झाली होती. आता या मालिकेनं 2800 हून अधिक भागांचा टप्पा पार केला आहे. या मालिकेतून केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात नाही तर मालिकेच्या शेवटी एक सामाजिक संदेशही दिला जात असतो. समाजात घडणार्‍या प्रत्येक घडामोडींना मालिकेतून हलक्या फुलक्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येतं. त्यामुळं मालिकेचं विविध स्तरातून कौतुक झालं आहे.
छोट्या पडद्यावरील ही मालिका वादात सापडली आहे. मालिकेतून मनोरंजन करत सामाजिक भान जपणार्‍या या मालिकेत चुकीची माहिती दाखवत मराठी भाषेचा अपमान केला केला असून मालिकेतील काही संवादावर सब टीव्ही आणि मालिकेतील निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.तारक मेहता का उल्टा चश्माफ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला आहे. मालिकेतील या भागात जेठालालचे वडील म्हणेजच बापुजी मुंबईची भाषा हिंदी असल्याचं सोसायटीतील इतर सदस्यांना सांगताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असून सब टीव्हीनं याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे. महमारा गोकुलधाम मुंबई में हैं, और मुंबईकी आम भाषा क्या है? हिंदी... इसलिए हम सुविचार हिंदी में लिखते है, अगप हमारा गोकुलधाम चेन्नई में होता तो तामिळ मे लिखते,अशा प्रकारचा संवाद मालिकेत दाखण्यात आला असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. मनसेचा याच वृत्तीला विरोध आहे. मुंबईची भाषा मराठी आहे हे यांना व्यवस्थित माहित आहे. तरी देखील मालिकांमधून अशा प्रकारचा अपप्रचार केला जातोय. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. तसंच मालिकेत काम करणार्‍या मराठी कलाकारांना देखील यात चुकीचं वाटत नाही याबद्दल शरम वाटते, अशा शब्दांत खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. हा वाद उफाळल्यानंतर मालिकेचे निर्माता असितकुमार मोदी यांनी सीरियलच्या शेवटी प्रसारित झालेला एक सीन ट्विट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे आणि आपल्या महाराष्ट्राची राजभाषा मराठीच आहे. यात काही संदेह नाही. मी भारतीय आहे. महाराष्ट्रीय आहे आणि गुजराती देखील आहे. मी सर्व भारतीय भाषांचा सन्मान करतो, असं मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. 
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि बहुभाषिक शहर आहे, असे म्हणताना अनेकदा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि इथली भाषा मराठी आहे, याचे विस्मरण घडते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात 106 हुतात्म्यांचे बलिदान देऊन महाराष्ट्राने मुंबई जिंकली आहे, याचा विसर पडला तर तो त्या हुतात्म्यांचा अवमान ठरेल. परंतु आपल्याकडे मराठीचा अभिमान केवळ राजकारण करण्यापुरता आणि मराठी भाषा दिनाचे कर्मकांड पार पाडण्यापुरता मिरवला जातो. बाकी व्यवहारातून मराठी हद्दपार होत आली आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून पोट भरण्यासाठी येणार्‍या कष्टकर्‍यांना मुंबई आपल्या पोटात सामावून घेत गेली आणि ते सामावून घेता घेता मुंबईचे मराठीपण हरवत चालले. मराठी माणसाची ही सहिष्णुता हीच खरी मराठी संस्कृती आहे. परंतु, ही संस्कृती आत्मसात करता करता मराठी माणूस आपली मूळ मराठी संस्कृती मात्र विसरत गेला. मग ती मराठी भाषा असो किंवा सण उत्सव. येत्या आठवड्यातच धुळवडीच्या दिवशीच रंगपंचमी खेळून आपण उत्तर भारतीय संस्कृती किती आत्मसात केली आहे, हे मुंबई आणि परिसरातील मराठी लोक दाखवून देतील. या उदार सहिष्णुतेचाच गैरफायदा घेत काही समाजघटक आपली भाषा, संस्कृती या लादत गेले. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील संवादाच्या माध्यमातून जी वृत्ती समोर आली आहे, ती अशा सांस्कृतिक मुजोरीचे प्रतिनिधित्व करणारी आहे. यासंबंधीची बातमी आली तेव्हाच, एक मोठे व सांस्कृतिक मराठी शहर म्हणून ओळखले जाणार्‍या डोंबिवलीत फक्त मराठी माणसांना प्रवेशबंदी असलेली क्रिकेटस्पर्धा आयोजित केल्याची बातमी येते. या दोन्ही घटना योगायोग म्हणून सोडून देता येणार नाहीत. मुंबईतील मराठी माणसांसंदर्भात, मराठी संस्कृतीसंदर्भात परप्रांतीय लोकांच्या काय धारणा आहेत, याचे प्रतिबिंब त्यातून दिसते. तारक मेहता..फ ही दीर्घकाळ चाललेली लोकप्रिय मालिका आहे आणि प्रेक्षकांचा सरासरी बुद्ध्यांक आणि भावनांक लक्षात घेऊन ती चालवली जाते. त्यातील बाळबोधपणाला निरागसतेची जोड असल्यामुळे त्यातला आचरटपणा कधी कधी खपूनही जातो. परंतु जेव्हा या मालिकेत संवादाच्या माध्यमातून मुंबईच्या स्थानिक भाषेलाच आव्हान दिले जाते, तेव्हा त्यामागील तिरकी चाल समजून घेणे क्रमप्राप्त ठरते.
मुंबईची भाषा हिंदी आहे,असे वाक्य संबंधित पात्राच्या तोंडी असते तर दुर्लक्ष करता आले असते आणि अनवधानाने घडलेली चूक म्हणून दुर्लक्ष करता आले असते. परंतु गोकुलधाम मुंबई में है और मुंबई की आम भाषा क्या है?... हिंदी. इसलिए हम सुविचार हिंदी में लिखते है. अगर हमारा गोकुलधाम चेन्नई में होता तो हम सुविचार तमिळ में लिखते असा हा अत्यंत आक्षेपार्ह संवाद आहे. चेन्नईची भाषा तमिळ आहे, हे या लेखकाला माहीत आहे, याचा अर्थ मुंबईची भाषा मराठी आहे, हेही माहीत असणार. तरीही हिंदी पुढे केली जाते. हीच चूक यांनी अहमदाबाद किंवा बेंगळुरूच्या भाषेबाबत केली असती का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याची दखल घेतल्यानंतर संबंधित निर्माते आणि कलावंतांनी सारवासारव केली, परंतु स्पष्ट शब्दात माफी मागितलेली नाही. यावरूनही, त्यांच्या मनोवृत्तीची कल्पना येते. खरेतर दिलगिरी मागितली तरी हा विषय सोडून देता कामा नये. निर्माता-दिग्दर्शकांनी मालिकेमध्येच स्पष्ट दिलगिरी व्यक्त करावयास हवी. आणि मालिकेच्या ज्या भागात वादग्रस्त संवाद आहेत, ते संवाद मुंबईची भाषा मराठी आहे असे बदलून घ्यायला हवेत. समाजमाध्यमांवर या सुधारित भागांचे प्रसारण व्हायला हवे. एवढा आग्रह धरला तरच आपण मराठीबाबत संवेदनशील आहोत, असा स्पष्ट संदेश जाईल आणि भविष्यात कुणी मराठी भाषा, मराठी अस्मिता यांच्याशी खेळ करणार नाही. ही मानसिकता कुणा एका व्यक्तीची नसते, तर इथल्या समाजाचा वर्तनव्यवहार पाहून अनेक ठिकाणी त्या समाजाची चाचणी घेतली जाते. डोंबिवलीतील क्रिकेट स्पर्धेत फक्त गुजराथी, कच्छी आणि मारवाडी स्पर्धकांनाच प्रवेश होता. म्हणजे बहुसंख्य मराठी स्पर्धकांना बंदी घालण्यातूनही तसाच चाचणी प्रयोग केला जातो. वैशिष्ट्य म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे छायाचित्र छापून संबंधित पत्रक माध्यमांमध्ये फिरवले आहे. मराठी भाषा, मराठी माणूस यांची उपेक्षा करण्याची ही साथ वेळीच रोखली नाही तर भविष्यात हे अतिक्रमण वाढत जाईल आणि मराठी भाषा व समाजाच्या पुरते मूळावर उठणार आहे.