Breaking News

सोशल मीडियाच्या विळख्यात युवा पिढी

आज सर्वत्र असे पाहायला मिळत आहे की, महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी हे अभ्यासापेक्षा मोबाईल्सवर गुंतलेले असतात, म्हणजे ‘बिझी’ असतात. यातील कुणी फेसबुकवर तर कुणी व्हॉट्सअपवर गुंतलेले असतात. विविध मोबाईल कंपन्या व सिम कार्डवाले ग्राहकांना खुश व आकर्षित करण्यासाठी इंटरनेटच्या आकर्षक ऑफर जाहीर करतात. पण ग्राहकांच्या पैशातूनच या सोई दिल्या जातात, हे आपण सोयिस्कररित्या विसरतो आहोत. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आहेत. परंतु सध्या विद्यार्थी काय करतात, ते अभ्यासासाठी किती वेळ देतात आणि मनोरंजनासाठी किती वेळ देतात, याकडे पालकांनी गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा शिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर आपला मुलगा टाईमपास करण्यापुरता शिकलेला आहे, असे सर्वांच्याच लक्षात येते. त्यावेळी वेळ गेलेली असते. वेळ कुणासाठी थांबत नाही. मुलांनी स्मार्टफोन वापरण्याचा अतिरेक थांबवून ज्ञान संपादन करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्मार्टफोन वापरायला हरकत नाही, परंतु फोनच्या अतिवापरामुळे  विद्यार्थ्यांचा मेंदू प्रभावित होत आहे का? याचाही विचार कुटुंबातील सदस्यांनी व स्वतः विद्यार्थ्याने करणे गरजेचे आहे. शिक्षणातील उपयुक्त सॉफ्टवेअर व मोफत शिक्षण कार्यक्रम विद्यार्थी डाउनलोड करत नाहीत, असे दिसून येते. शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असताना विद्यार्थी इतर गोष्टी करत असतील तर ते स्वतःच्या पायावर दगड मारुन घेत आहेत, असे वाटते. प्रगत तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर, मोबाईल फोन आणि अन्य गॅझेट्सचा वाढता वापर मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीला त्रास देत आहे. विद्यार्थी हे त्यांच्या मोबाइल फोनशी सातत्याने संबंध विकसित करत आहेत, त्यामुळे ते मोबाईलच्या जादुई नगरीत हरवले आहेत, असे दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि अभ्यास यांवर वाईट परिणाम दिसत आहे. आणि वेळ खर्च होतो, तो वेगळाच. वेळ हा मौल्यवान आहे. ज्यांचा वेळ वाया गेला आहे, त्यांना वेळेची किंमत किती असते ते माहित असते.मोबाईलवर रमल्यामुळे विद्यार्थ्याचे अभ्यासाकडे व घराकडे दुर्लक्ष होते, याचा अर्थ  विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद साखळी तुटत आहे. विद्यार्थ्यांना याचे दुष्परिणाम जेव्हा समजू लागतात, तोपर्यंत विद्यार्थ्यासोबतचे सहकारी त्याच्या पुढे गेलेले असतात. शकतात.मोबाइलमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव रहातो, असे आढळून येते. ‘डेली मेल’ या प्रसारमाध्यमाने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, हेवी इंटरनेट आणि मोबाइल फोनचा नेहमी वापर करणार्यांची एकाग्रता ढळल्याचे दिसते आणि त्यांचा स्वभाव विसरभोळा असतो. ते निष्क्रीय मनाची वाटचाल करत असतात. आईवडील आपल्या मुलांना कमी वयात सर्व सुविधा देऊ इच्छितात जेणेकरून त्यांना एक परिपूर्ण करिअर मार्ग बनवता येईल. ते त्यांच्या मुलांसाठी सर्वात महाग स्मार्टफोन विकत घेतात, यामुळेच विद्यार्थ्यांची समस्या निर्माण होत असते. विद्यार्थी त्यांची प्रतिमा चार मुलांमध्ये वाढावी , यासाठी मोबाईल्स घूतात, असे एक कारण आढळते.  या मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणावर थेट परिणाम होण्यासारखा आहे, तो सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. जर शिक्षक वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करीत असेल, तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. परंतु, विद्यार्थी जर फोनवर बराच वेळ, तासभर गप्पा मारत असेल तर निश्‍चितपणे त्याच्या / तिच्यावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता असते.  ‘गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सेंटर फॉर इकॉनॉमिक परफॉर्मन्सने प्रकाशित केलेल्या लुई-फिलिप बेलँड आणि रिचर्ड मर्फीने केलेल्या संशोधनानुसार, ‘इल कम्युनिकेशन: द इंपॅक्ट ऑफ मोबाइल फोन ऑन स्टुडंट्स परफॉर्मन्स’ च्या अहवालात असे आढळून आले की, शाळांनी मोबाईल फोनवर बंदी घातल्यानंतर 16 वयोगटातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी 6.4% नी वाढली. शिक्षणासंबंधित अ‍ॅप्सबद्दल जाणून घेण्याव्यतिरिक्त, मुले वारंवार संगीत ऐकणे,
मोबाईल गेम्स खेळणे, गप्पा मारणे आणि मित्रांना कॉल करणे, सोशल मीडियाचे अनुसरण करणे, असे प्रकार मुले करत असतात. मोबाईल फोन्सचा अवास्तव उपयोग हे विद्यार्थ्यांसाठी एक मोठे प्रश्‍नचिन्ह बनले आहे आणि त्यात त्यांचा वेळ वाया जातो. हे विद्यार्थी सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी विसरतात, त्या प्रमाणात विद्यार्थी हे आभासी जगण्यात गुंतलेले आहेत. हे आभासी जग फार मोठे आहे, यातून बाहेर येण्यासाठी पालकांनी सकारात्मक गोष्टींचा वापर केला पाहिजे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे ही प्रक्रिया म्हणायला सोपी वाटते, परंतु ती अधिक अवघड असल्याचे दिसत आहे. समुपदेशन करण्यासाठी मानसतज्ञांची गरज भासते, पण मानसतज्ञांकडे जाण्याएवढी मानसिकता पालकांची असायला हवी. पालक जर सुशिक्षित नसतील तर समुपदेशन कुणाकडे व कोणी करायचे, हा प्रश्‍न अनुत्तरीत राहतो. मित्र आणि इतर लोकांशी 24 तासांच्या कनेक्शनमुळे विद्यार्थ्यांना त्रास, तणाव आणि नैराश्य येते. एका अभ्यासाच्या मते, विद्यार्थ्याची मनाला गोंधळात टाकणारी स्थिती यामुळे तयार होते, विद्यार्थी स्वतंत्र विचर करु शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी सृजनशक्ती गमावण्याचा धोका असतो. ते झोपू शकत नाहीत , झोपलेले असतानाही ते तणावमुक्त नसतात. त्यामुळे नैसर्गिक झोप मिळत नाही.
मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, चीन आणि सिंगापूर नंतर सायबर गुंडगिरीच्या उच्चतम दराने भारतात तिसरा क्रमांक लागतो. 8 ते 17 वयोगटातील 7,600 मुले सायबर गुंडगिरीचे बळी ठरले आहेत. सायबर गुंडगिरी   वाढत आहे. अनेकांनी ऑनलाइन एखादयाची टर उडवणे, महिलांना अश्‍लिल मॅसेज-चॅटींग,अश्‍लिल चित्रफिती दाखवणे,  असे अनेक अनुभव नेटवर असणार्यांना मिळत असतात. सायबर गुंडगिरीमुळे समाजावर प्रतिकूल परिणाम होतो.वाढत्या विद्यार्थी आत्महत्या, विद्यार्थ्यांमध्ये आक्रमकता वाढते,आत्मविश्‍वास कमी होणे, नैराश्य येते, या सर्व प्रतिकूल गोष्टी सायबर गुन्हेगारीमुळे घडतात. ‘ग्रामीण भारत’ या एका नवीन सरकारी सर्वेक्षणानुसार, भारतातील  ग्राहक वर्ग  हा सर्वसामान्य गोष्टींपेक्षा सेलफोन आणि कारवर अधिक खर्च करीत आहे. एनएसएसओच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भारतातील लोक आपल्या मोबाईल फोन आणि दूरध्वनीच्या उपयोगावर 25.33% उत्पन्न देतात. मासती प्रति व्यक्ति खर्च (एमपीसीई) च्या बाबतीत देखील शहरी भागात 36.35 रुपये आणि शहरी भागातील 102.46 रुपये सेवांमधील सर्वात जास्त रक्कम संचार सेवांमध्ये गेली आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, बहुविध सेवांच्या उपलब्धतेमुळे देशातील ग्रामीण भागात किंवा शहरी भागातही मोबाइल फोनचा वापर वाढला आहे.                         
 सॉफ्टवेअर सर्व्हिसेस फर्म टीसीएसच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 70 टक्के विद्यार्थी आज स्मार्ट फोनचा वापर करतात.हे सर्वेक्षण 14 भारतातील शहरांतील जवळजवळ 17,500 माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना घेण्यात आले. त्यात असे दिसून आले की स्मार्ट डिव्हाइसेस आणि ऑनलाइन प्रवेशाचा अभूतपूर्व स्तर या पिढीला सर्वाधिक जोडलेले आहे. ते एकमेकांशी संवाद साधून आणि त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक जीवनात परिवर्तन घडवून आणत आहेत. दहा पैकी जवळजवळ सात हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांनी मोबाइल फोन घेतले आहेत, तर 20 टक्के लोकांनी इंटरनेट वापरण्यासाठी (200 9 मध्ये फक्त 12 टक्के तुलनेत) मोबाईल फोनचा उपयोग केला. सुमारे 62 टक्के लोकांनी म्हटले आहे की त्यांनी ऑनलाईन चित्रपटांची खरेदी केली तर 47 टक्के पुस्तकांची खरेदी पुस्तके, डीव्हीडी आणि संगीत यांनी केली. फेसबुक बाबत सर्वात पॉपुलर सोशल नेटवर्किंग साइटने 83.38 टक्के अशी ग्राहकांच्या फेसबुक आवडीबद्दल नोंद केली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून मोबाईल व इंटरनेटचा वापर करावा. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जगाच्या स्पर्धेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केला तर यश दूर नाही.
अशोक सुतार
मो. 8600316798