Breaking News

श्री विशाल गणेश मंदिरास जागा बक्षीस

अहमदनगर/ प्रतिनिधी : शहराचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिर देवस्थानला माळीवाड्यातील, वरवंडेगल्ली येथील रहिवासी रामचंद्र मल्हारराव गिरमे पाटील यांनी वडिलोपार्जित जागा बक्षिसपत्राने देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांच्याकडे कागदपत्रे देऊन सुपूर्द केली. 
याप्रसंगी सत्यनारायण गिरमे, आदिनाथ गिरमे, हरिश्‍चंद्र गिरमे, पुजारी संगमनाथ महाराज, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, राम
कृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, बाबासाहेब सुडके, चंद्रकांत फुलारी, पांडुरंग नन्नवरे, ज्ञानेश्‍वर रासकर, गजानन ससाणे आदी उपस्थित होते.
यावेळी गिरमे परिवारातील कुंदा खेतमाळीस (मिरजगाव) यांनी स्व.मल्हारराव गिरमे यांच्या स्मरणार्थ 5001 रुपयांची देणगी देवस्थानकडे सुपूर्द केली. यावेळी देवस्थानच्या वतीने गिरमे परिवारातील सदस्यांचा  सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रमेश गिरमे, नीलेश गिरमे, उमेश गिरमे, शुभम गिरमे, अभिषेक गिरमे, सुरेखा गिरमे, मंदा बारवकर आदी उपस्थित होते.