Breaking News

उत्तरप्रदेशात दोन साधुंची तलवारीने हत्या

लखनौ : पालघरची ही घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे दोन साधुंची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा हे हत्याकांड घडलं आहे. या घटनेनं तेथील ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
बुलंदशहरमध्ये एका व्यक्तीनं मंदिर परिसरात दोन साधुंची धारदार शस्त्रानं हत्या केली. रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. त्यावेळी दोन्ही साधू झोपले होते. उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातील अनुपशहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पगोना गावात एक शंकराचं मंदिर आहे. या शिवमंदिरात गेल्या 10 वर्षांपासून साधू जगनदास (55 वर्षे) आणि सेवादास (35वर्षे) राहात होते. काल रात्री त्यांची हत्या झाली. मंगळवारी सकाळी ग्रामस्थ मंदिरात पोहोचले. त्यावेळी दोन साधुंचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचं आढळून आलं. यानंतर मंदिर परिसरात मोठी गर्दी जमली. पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी खुन्याला ताब्यात घेतलं आहे. साधुंच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारा व्यक्ती नशेच्या आहारी गेल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी सकाळी लोकं मंदिराकडे गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या दोन्ही साधूंचे शरीर रक्ताच्या थारोळ्यात मंदिर आवारातच पडल्याचे दिसून आले. या घटनेने ग्रामीण भागातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून ते मंदिराकडे आले आहेत. या घटनेबाबत ग्रामस्थांनीच पोलिसांनी माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनेमागचं कारण अस्पष्ट आहे. यासंदर्भात सीओ अतुल चोबे यांनी घटनेचा तपास सुरु असल्याचे सांगतिलंय. तसेच, ग्रामस्थांन एका युवकावर संशय व्यक्त केला असून पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील पालघर येथेही तीन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधूंची आणि गाडीचा चालक अशा तिघांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. याप्रकरणी 100 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात दोन साधूंची हत्या झाल्यानंतर राजकारण पेटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दोन साधूंच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपीविरोधाक कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर घटनास्थळाची पाहणी करून अहवाल तयार करण्याचे चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.