Breaking News

भारत-चीन सैनिकांमध्ये सीमेवर संघर्ष!

दोन्ही देशांचे जवान जखमी ; सीमेवर काहीकाळ तणाव 
नवी दिल्ली : चीनच्या सैन्याने सिक्कीम सीमेवर उद्दामपणा दाखवण्याचा प्रयत्न केल्यामुळे भारतीय सैन्याने देखील उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यामुळे सीमेवर काही काळ तणाव निर्माण झाला होता. यामध्ये दोन्ही देशांचे जवान जखमी झाले असून, या प्रकारामुळे सीमेवर काहीकाळ तणाव पाहायला मिळाला.
चीनी सैनिकांचा असा उद्दामपणा यापूर्वीही दाखवला होता. आज घडलेल्या घटनेत भारताचे आणि चीनचे काही सैनिक किरकोळ जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये काही बाचबाचीही झाली. परंतु स्थानिक पातळीवरील यंत्रणांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद निवळला. काही वेळ दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बाचाबाची सुरू होती. परंतु त्यानंतर ते आपापल्या पोस्टवर परत गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसंच बर्‍याच कालावधीनंतर अशाप्रकारची घटना घडल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. एएनआयनं लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
उत्तरी सिक्कीम येथील नाकुला सेक्टरमध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यात भारताचे 4 तर चीनचे 7 सैनिक जखमी झाले. त्यानंतर निश्‍चित यंत्रणेसह स्थानिक पातळीवर प्रकरण निकाली काढले गेले. थोड्या काळासाठी हा तात्पुरता संघर्ष झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही सैन्यांमधील संघर्षाचा हा प्रकार बर्याच दिवसांनी घडला. या संपूर्ण घटनेबाबत अधिकृत माहिती ईस्टर्न कमांड देणार आहे. दरम्यान, चीनच्या सैनिकांचा उद्दामपणा भारतीय लष्कराला काही नवीन नाही. ऑगस्ट 2017 मध्येही अशीच घटना घडली होती. लडाखमध्ये हा प्रकार घडला होता. त्यावेळी एकमेकांवर दगडफेकही झाली होती. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका दुर्गम मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर आता नेपाळमध्ये विरोध प्रदर्शन सुरू झाले आहे. यावर नेपाळ सरकारने कडक शब्दात आक्षेप घेतला असून, लिपुलेखवर पुन्हा दावा केला आहे. दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सर्व काम भारतीय हद्दीतच झाल्याचे सांगत नेपाळचा दावा खोडून काढला आहे. हा भाग उत्तराखंड राज्यातील पिथोरागडचा हिस्सा आहे. पण नेपाळने याला कायमच विरोध केलेला आहे. या नव्या रस्त्यामुळे आता भारतीय चौक्यांपर्यंत पोहोचणे सहजशक्य होणार आहे. 17000 फूट उंचीची लिपुलेख खिंड उत्तराखंडच्या धारचुलाशी सहज जोडली जाणार आहे. या रस्त्याची लांबी 80 किलोमीटर आहे. लिपुलेख खिंडीतून मानसरोवर सुमारे 90किमी अंतरावर आहे.
दोन्ही देशांमध्ये 2017 मध्येही झाला होता तणाव
यापूर्वी 2017 मध्ये दोन्ही देशांदरम्यान सिक्कीममध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी निर्माण झालेला तणाव इतका मोठा होता की भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीही अनेक दिवस या ठिकाणी कँपिंग केलं होतं. यामध्ये 17 व्या डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंगही सामिल होते. दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीची परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या मुख्यालयानंही दखल घेतली होती.