Breaking News

लॉकडाऊनमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद

23 हजार व्यक्तींना अटक ; 4 लाख 60 हजार पासचे वाटप 
मुंबई : राज्यात लॉकडॉऊन करण्यात आल्यापासून आतापर्यंत 4 लाख 60 हजार व्यक्तींना अत्यावश्यक सेवेसाठी पास देण्यात आले असून, तब्बल 1 लाखांपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 23 हजारापेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 60 हजार 318 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच 5 लाख 86 हजार व्यक्तींना कॉरंटाईन करण्यात आले आहे. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. 22 मार्च ते 7 जून या कालावधीत कलम 188 नुसार 1,23,637 गुन्हे नोंद झाले असून 23,893 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 6 कोटी 78 लाख 09 हजार 891 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 262 घटना घडल्या. त्यात 845 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,00,687 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर र्टीरीरपींळपश असा शिक्का आहे अशा 718 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 5,86,967 व्यक्ती र्टीरीरपींळपश आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणार्‍या 1332 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 80,532 वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 20 पोलीस व 1 अधिकारी अशा एकूण 21, पुणे 2, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 3, ए.टी.एस. 1, मुंबई रेल्वे 1, ठाणे ग्रामीण 2, जळगाव ग्रामीण 1 अशा 34 पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या 196 पोलीस अधिकारी व 1241 पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या एकूण 310 रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास 16,728 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.