Breaking News

अनलॉक जीवावर उठले; जिल्ह्यात 24 कोरोना रुग्ण वाढले!


- कोरोनाचा विळखा घट्ट
- पाच रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर/ प्रतिनिधी 
राज्य सरकारने सुरु केलेली अनलॉक-1ची अमलबजावणी जिल्हावासीयांच्या जीवावर उठली असून, कोरोना रुग्णांची संख्याने झपाट्याने वाढत आहे. बुधवारी तब्बल 24 रुग्ण वाढलेत. त्यात नगर शहरात तब्बल अठरा तर संगमनेरमध्ये चार, जामखेड व श्रीरामपूर तालुक्यात प्रत्येकी एक अशा रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 62 झाली असून एकूण रुग्णसंख्या 328 इतकी झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील पाच रुग्ण बुधवारी कोरोनावर मात करून घरी परतले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये संगमनेर येथील तीन,  कर्जत आणि नगर शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 254 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक आहे. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात नगर शहरातील आठ आणि जामखेड तालुक्यातील जवळे येथील एक आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 62 झाली असून एकूण रुग्ण संख्या 328 इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील 80 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय पुरुष आणि बावीस वर्षे युवक यांचा समावेश आहे. याशिवाय, नगर शहरातीलच सिद्धार्थ नगर भागातील आठ वर्षाची मुलगी, 32 वर्षीय युवक, तीस वर्षीय महिला, 25 वर्षीय युवक यांचा अहवाल पॉझिटिव आला तसेच नालेगाव येथील वाघ गल्ली येथील बावीस वर्षीय युवकही बाधित आढळून आला आहे. हे सर्वजण यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. याशिवाय, जामखेड तालुक्यातील जवळे येथील 30 वर्षीय व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आली आहे. ही व्यक्ती मुंबईहून प्रवास करून आली होती. तसेच संगमनेर शहरातील 55 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव आढळून आली आहे.
सकाळच्या दुसर्‍या सत्रात 10 रुग्ण वाढल्यानंतर पुन्हा सकाळच्याच दुसर्‍या सत्रात आणखी नव्याने 10 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये नगर शहरातील सात, संगमनेर दोन आणि श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 58 झाली असून एकूण रुग्ण संख्या 324 इतकी झाली आहे तर 254 जण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील 05 रुग्ण बुधवारी कोरोनावर मात करून घरी परतले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये संगमनेर येथील 03, कर्जत आणि नगर शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 254 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.