Breaking News

श्रीगोंदा तालुक्यातील 14 व्यक्तींचे घशातील स्त्राव पाठविणार

- तालुका आरोग्याधिकारी डॉ. नितीन खामकर यांची माहिती

येळपणे/ प्रमोद आहेर
श्रीगोंदे तालुक्यातील 35 कोरोना चाचण्यांपैकी 34  चाचण्यां नकारात्मक आल्यानंतर एका व्यक्तीची कोरोना चाचणी प्रतीक्षेत असतानाच, गुरुवारी श्रीगोंदा तालुक्यातील येळपण्याच्या सहा,  हिरडगावच्या चार, अजनुज च्या दोन, श्रीगोंद्यायचा एक आणि साळवण देवी परिसरातील एक अशा 14 व्यक्तींचे घशातील स्राव तपासण्यासाठी पाठवले जाणार असल्याची माहिती श्रीगोंदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.
श्रीगोंदे तालुक्याची  कोरोना परिस्थिती कधी दिलासादायक तर कधी धक्कादायक अशा दोलायमान अवस्थेतून वाटचाल करीत आहे. लोक स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी न घेता बिनधास्त संपर्क करतात आणि हाताने कोरोनाची बाधा ओढवून घेतात, असे चित्र एकंदरीत पुढे येत आहे. आपल्याला  कोरोनाची बाधा होऊ नये, असे वाटत असेल तर प्रत्येकाने कोरोनाचा संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी व सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत असे आव्हान डॉ. नितीन खामकर यांनी केले आहे. कोरोना विषाणूमध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही. लोकांनी कोरोनाचा बाऊ करून अफवा पसरविल्याने लोक घाबरतात.