Breaking News

जिल्ह्यात 15 तर येळपणेत तीन कोरोना रुग्ण आढळले

- श्रीगोंद्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

प्रमोद आहेर/येळपणे
श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावातील 20 जणांच्या घशाचे स्त्राव घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यातील येळपणे येथील  तीन जण पॉझिटीव्ह आल्याने श्रीगोंदेकरांची धास्ती पुन्हा वाढली आहे. दोन पुरुष व एका महिलेचा त्यात समावेश आहे. भिवंडी येथून हे लोक कोरोना घेऊन गावात आले आहेत. इतर 17  जण  निगेटिव्ह आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, सुरेगाव येथील अहवाल निगेटिव्ह आला आहे. तेथील लोकांमध्ये घबराट होती पण ती संपली आहे.  श्रीगोंदा शहर, अजनुज येथील अहवाल निगेटिव्ह आले. येळपणे येथील तिघांमुळे अडचणी वाढल्या आहेत.

जिल्ह्यात 15 कोरोना रुग्ण आढळले
अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी 8 कोरोनग्रस्त आजारातून बरे होऊन घरी परतले. यामध्ये, संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन, नगर तालुका आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 273 झाली आहे. तर, शनिवारी आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात नव्याने 15 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील क्टिव रुग्णांची संख्या ही 111 झाली आहे.
शनिवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरात 6 बाधित आढळून आले आहेत. यामध्येनालेगाव 3, आडते बाजार 1, तारकपूर 1 आणि तोफखाना 1 असे रुग्ण आढळले आहेत. यातील तारकपूर येथील रुग्ण हा भोपाळ येथून प्रवास करून आला होता. याशिवाय, श्रीगोंदा तालुका 03, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर आणि पारनेर तालुका प्रत्येकी 01 आणि  राहाता तालुक्यात 02 कोरोना बाधित आढळले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील बाधित आढळलेल्या व्यक्ती भिवंडी येथून प्रवास करून आल्या होत्या,अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 
दरम्यान, जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या आता 111 झाली असून एकूण नोंद रुग्ण संख्या 397 इतकी झाली आहे तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.