Breaking News

औरंगाबाद विमानतळावरून 17 जूनपासून होणार उड्डाण

औरंगाबद : कोरोनामुळे बंद असलेली विमानसेवा सुरू झाली आहे. औरंगाबाद विमानतळावरून 17 जूनपासून औरंगाबाद - दिल्ली विमानसेवेचे उड्डाण सुरू होणार आहे. यासाठी इंडिगोने तिकिट बुकिंगसाठी प्रारंभ केला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गेल्या अडीच महिन्यांपासून विमानसेवा बंद आहे. औरंगाबादहून जुलैपासून विमामांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. मुंबई , दिल्ली , हैदराबाद आणि बंगळुरूसाठी या कंपनीकडून जुलैपासून बुकिंगदेखील सुरू करण्यात आली. जुलै ऐवजी जूनपासून औरंगाबादहुन विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी उद्योजक सुनीत कोठारी यांनी इंडिगोकडे केली होती. याविषयी काय निर्णय घेण्यात येतो, याकडे लक्ष लागले होते. मुंबईसह विविध शहरांतून 25 मे पासून विमानांचे उड्डाण सुरू झाले. परंतु औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली. औरंगाबादची विमानसेवा वेटिंगवर होती. दुसरीकडे दिवसाला सुमारे तीनशे रुग्णांची वाढ होणार्‍या पुणे शहरातून विमानसेवा सुरु झाली होती. मात्र , दुसरीकडे दिवसभरात अवघे काही रूग्ण वाढणार्‍या औरंगाबादेत विमानसेवा का सुरु केली जात नाही , असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला होता. उद्योग , व्यापारासाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी उद्योजकांनी केली. अखेर इंडिगोने दिल्ली- औरंगाबाद या हवाई मार्गावर 17 जूनपासून उड्डाण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.