Breaking News

सातारा नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी 2 लाख 30 हजाराची लाच घेताना जाळ्यात


सातारा / प्रतिनिधी : सातारा नगरपरिषदेचा उपमुख्याधिकारी संचित धुमाळ याने 2 लाख 30 हजार रुपयाचा लाच घेताना सोमवार, दि. 8 रोजी लाच लुचपतप्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकारावरून सातारा नगरपरिषदेमधील भ्रष्ठाचाराच्या कुरणाचा पर्दाफाश करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागास यश आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सा
तारा नगरपरिषदेमध्ये बरीच कामे अधिकार्‍यांना हाताशी धरुन केली जातात. अशा नुसत्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. यास कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता, त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी भ्रष्ठाचार करतात याबाबत काहीही बोलता येत नव्हे. मात्र, सोमवार, दि. 8 रोजी दुपारी सातारा नगरपरिषदेचा उपमुख्यकार्यकारी अधिकारी संचित धुमाळ यास एका व्यक्तीकडून 2 लाख 30 हजार रुपयाची लाख घेताना रंगेहाथ पकडण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक अशोक शिर्के यांनी धुमाळ यास अटक केली.
या घटनेत धुमाळ याच्याबरोबर सहभागी असलेल्यांची दुपारपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी धरपकड सुरु केली आहे. त्यामुळे पालिकेच्या काही कर्मचार्‍यांनी आपापले फोन बंद करणे पसंद केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
संचित धुमाळ याने ही रक्कम चक्क सातारा नगरपरिषदेच्या कार्यालयात स्विकाल्याने कार्यालयाच्या आवारात काय चालते? यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात धुमाळ याच्यासोबतच्या संशयितांची दुपारपासून धरपकड सुरु आहे. सातारा नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून प्रथम श्रेणी दर्जाच्या अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले आहे. सातारा नगरपरिषदेमध्ये यापूर्वी कधीही अशी कारवाई झाली नसल्याने राज्यभर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.