Breaking News

मुंबईत एकाच दिवशी कोरोनामुळे 4 पोलिसांचा मृत्यू

मुंबई ः राज्यात पोलिस दलात कोरोनाचा वेगाने शिरकाव होत असून, मुंबईत याचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणावर आहे. मुंबईत शनिवारी कोरोनामुळे 4 पोलिसांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. 
कोरोनाच्या संकटात पोलिस बांधव कोरोना योद्धे म्हणून रस्त्यावर उतरून आपली ड्युटी करत आहेत.  जेव्हा लॉकडाऊनमध्ये सगळे घरात बसले होते, तेव्हा पोलीस मात्र कोरोनासाठी संवेदनशील परिस्थिती असलेल्या रस्त्यांवर उतरून कर्तव्य बजावत होते. आता या पोलीस विभागालाच कोरोनाची लागण झाली असून आत्तापर्यंत तब्बल 2 हजारहून जास्त मुंबई पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आजपर्यंत 127 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांमध्ये काही प्रमाणात तणावाचे वातावरण यला मिळत आहे. आज मृत्यू झालेल्या पोलिसांमध्ये बोरीवली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी (वय 42 वर्षे), दिंडोशी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार, वाकोला पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आणि संरक्षण शाखेतील पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक अशा चौघांचा समावेश आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. लॉकडाऊनचा हा तिसरा महिना आहे. पहिल्या दिवसापासूनच सर्वात जास्त ताण पोलिसांवर पडतोय. काही वेळा 20 तास सलग पोलीस अधिकारी-कर्मचारी फील्डवर काम करत आहेत. लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळायला लावायची पहिली जबाबदारी पोलिसांवर आली आहे. या पोलिसांच्या मृत्यूचं मला प्रचंड दु:ख आहे. सरकार हे टाळण्यासाठी काळजी घेतच आहे. पण त्यानंतरही अशी घटना घडणं दुर्दैवी आहे.