Breaking News

85 वर्षांच्या आज्जीने कोरोनाला हरवले

कोळगाव/प्रतिनिधी : काही दिवसापूर्वी मुंबईहून श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगाव या आपल्या गावी आलेल्या 85 वर्षीय आज्जीना कोरोनाची लागण झाल्याने अहमदनगर येथील बूथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र मनाचा कणखरपणा , उपचारांना योग्य प्रतिसाद आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या आजीनी कोरोना आजारावर मात केल्याने आज दि.10 रोजी त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला.
मुंबई येथून 26 मे रोजी श्रीगोंदा तालुक्यातील आपल्या कोंडेगव्हाण या गावी आल्यानंतर त्यांना स्वसना संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात मधूमेह आणि इतर आजारांचाही त्रास होत असल्याने सुरुवातीचे तीन - चार दिवस त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सुरू आलेल्या उपचारास आजीबाईंनी चांगला प्रतिसाद दिला.आणि ठणठणीत बरे होऊन तिथून त्या बाहेर पडल्या. कोरोना सारख्या आजारातून बरे होऊन त्यांनी या आजाराला आपण हरवू शकतो, असा आत्मविश्‍वास त्यांनी इतरांमध्ये ही निर्माण केला आहे.
चौकट
उपाययोजनांची उत्तम अंमलबजावणी
श्रीगोंदा तालुक्यात प्रशासनाने केलेल्या सुरवातीच्या काळातील उपाययोजनांमुळे तालुक्यात कोरोनाने प्रवेश केला नव्हता. शासनाने नागरिकांना आपापल्या मूळगावी परत जाण्यासाठी परवानगी दिल्याने तालुक्यात कोरोनाने प्रवेश करत 3 रुग्ण तालुक्यात आढळून आल्याने एकच खळबळ झाली होती. 85 वर्षाच्या आजींना डिस्चार्ज दिल्याने तालुक्यातील शेवटचा रुग्ण बरा होऊन घरी परतला.