Breaking News

अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी विजयसिंह गुंड

काष्टी/प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील ‘लोकमंथन’चे काष्टी प्रतिनिधी विजयसिंह गुंड यांची राज्यपातळीवर काम करणार्‍या अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद मेहरे यांनी निवडीचे पत्र दिले.
संस्थेची स्थापना ही प्रामुख्याने समाजात पत्रकारांना मिळणारे स्थान, सामाजिक जडणघडणीत पत्रकारांना व त्यांच्या लेखन साहित्याचा होणारा र्‍हास, सामा
जिक पातळीवर होणारे पतन, नवनिर्मित पत्रकारांना समाजात मिळणारे स्थान, पत्रकाराविषयी समाजात असणारी विचारधारा, त्यांचे लेखन साहित्य अबाधित राहण्याकरिता भावी पिढीला सकस साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या कौटुंबिक संवर्धनासाठी, समाजातील आर्थिक, दुर्बल व मागासलेल्या वर्गाकरीता तसेच समाजातील इतर घटकांकरिता त्यांच्या विकासाच्या दृष्टीने एक सामाजिक प्रयत्न म्हणून संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या नियमांचे पालन करून संस्थेची उद्दिष्ट्ये व ध्येय धोरणांच्या अधीन राहून कार्य करणार असल्याची माहिती विजयसिंह गुंड यांनी दिली. यावेळी ‘दैनिक लोकमंथन’चे अहमदनगर विभागाचे संपादक डॉ.अशोक सोनवणे, संस्थेचे प्रदेशाध्यक्ष कुमार कडलग, उपसंपादक गोबरे यांनी विजयसिंह गुंड यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.