Breaking News

चीनला प्रतिउत्तर देण्यासाठी ५०० चायना वस्तूंवर व्यापारी महासंघाचा बहिष्कार

   
  मुंबई :
 चीनने सीमेवर जे काही घातक कारवाया सुरु केल्या आहेत त्याला आता बहिष्काराने उत्तर देण्याचे  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कैटनं ठरवलं आहे.  कैटनं चीनमध्ये (मेड इन चायना) तयार केल्या जाणाऱ्या ५०० वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  
 वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कैट) चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गलवाण खोऱ्यात सैनिकांवर करण्यात आलेल्या हल्ल्यावर देशभरातील व्यापाऱ्यांनी टीका केली. संधी मिळेल तेव्हा चीन भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. चीनची ही भूमिका भारताच्या विरूद्ध असल्याचं सांगत व्यापारी महासंघानं चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका महासंघाने घेतली आहे. ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या अभियानातंर्गत मंगळवारी बहिष्कार टाकण्यात येणाऱ्या ५०० मेड इन चायना वस्तूंची यादी जारी केली आहे.
 
 या वस्तूंवर  असेल बहिष्कार  :
 दैनंदिन कामात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, कापड (टेक्सटाइल), बांधकामासाठी लागणार साहित्य, पायताण (फुटवेअर), गारमेंटस, स्वयंपाक घरात वापरात येणारं सामान, हॅण्ड बॅग, कॉस्मेटिक, भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तू, ईलेक्ट्रीकल्स व ईलेक्ट्रॉनिक्, खाद्यान्न, घड्याळ, ज्वेलरी, स्टेशनरी साहित्य, कागद, घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फर्निचर, लाईटिंग, आरोग्यासंबंधी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, पॅकिंगसाठी वापरलं जाणारं साहित्य, ऑटो पाटर्स, दिवाळी व होळी या सणाच्या काळात विकल्या जाणाऱ्या वस्तू, चश्मे अशा ५०० प्रकारच्या श्रेणीतील ३००० वस्तू