Breaking News

अमित शाह यांच्या सुरक्षारक्षकांचे अपहरण करुन लुटमार

नवी दिल्ली ः केंद्रीय गृहमंत्री यांच्या ताफ्यात सुरक्षारक्षक असणार्‍या कर्मचार्‍यांचे अपहरण करुन त्याची लुटमार करण्यात आली. सोमवारी रात्री ते आपल्या ब्रेजा कारमध्ये ड्युटीसाठी दिल्लीकडे जात होते.तिघांनी त्या कॉन्स्टेबलचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडील ऐवज घेऊन आरोपी फरार झाले. 
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गुरुग्राममध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांचे अपहरण करून त्याला लुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा तीन चोरट्यांनी ही घटना घडवून आणली आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना मारहाण करून त्यांची गाडी लुटली. गुन्हा नोंदवून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल ऋषिपाल हे गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेखातर पोलीस ताफ्यात तैनात आहेत. सोमवारी रात्री ते आपल्या ब्रेजा कारमध्ये ड्युटीसाठी आपल्या कोसली (रेवाडी) येथून दिल्लीकडे जात होते. पटौदी परिसरात तीन अज्ञातांनी कॉन्स्टेबल ऋषिपालवर हल्ला करुन त्याचे अपहरण केले. नंतर, तिघांनी त्या कॉन्स्टेबलला सोडले आणि त्याची गाडी लुटल्यानंतर फरार झाले.