Breaking News

अमेरिकेचा चीनला शह !

नवी दिल्ली ः जगभरात कोरोनाचा फैलाव होण्यास चीन जबाबदार असल्याचे अमेरिकेचे स्पष्ट मत आहे. आज अमेरिकेत कोरोनाचा फैलाव मोठया प्रमाणावर झाला असून, दररोज हजारा लोक मृत्यूमुखी पडत आहे. या परिस्थितीला अमेरिका चीनला जबाबदार धरत असून, चीनचे धोरण मोडीत काढण्याची भूमिका अमेरिकेने घेतल्यामुळे चीनला शह देण्यासाठी पॅसिफिक महासागरामध्ये अमेरिकेने तीन युद्धनौका तैनात केल्या आहेत. 
भारत आणि चीन वादामध्ये अमेरिकेने का
यमच भारताला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. याच सर्व पार्श्‍वभूमीवर पॅसिफिक महासागरामध्ये मागील तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच विमानवाहू नौका तैनात केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून अमेरिकेच्या तीन विमानवाहू नौका पॅसिफिक महासागरामध्ये चीनच्या समुद्र सीमांपासून काही अंतरावर गस्त घालत असल्यामुळे चीनला हा मोठा शह असल्याचे मानले जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आणि चीनमधील तणावपूर्ण संबंधांमध्येच आता चीन आणि भारतामधील तणाव वाढल्याने ही जहाजे तैनात करण्यात आली आहेत. अमेरिकन नौसेनेची क्रूझर जहाजे, विध्वंसक जहाजे, युद्ध विमाने आणि इतर सहाय्यक विमानांनी सुसज्ज अशा तीन युद्धनौका पॅसिफिक महासागरामध्ये दिसून आल्या आहेत. अमेरिकेकडून करोनाच्या पार्श्‍वभूमीवर चीनवर रोज टीका आणि आरोप केले जात आहेत. अमेरिकेने हाँगकाँगमध्ये लागू केलेल्या वादग्रस्त कायद्यासंदर्भात आणि दक्षिण चीनच्या समुद्रामधील मानवनिर्मित बेटांवर लष्कर नियुक्त करण्याच्या निर्णयावरही आक्षेप घेत टीका केली आहे. सेंटर फॉर स्ट्रॅटर्जिक अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडीजअंतर्गत चीनमधील विजनिर्मिती प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणारे बोनी ग्लेजर यांनी, चीनमध्ये प्रकाशित होणार्‍या वृत्तपत्रांमधील लेखांमधून अमेरिकेत करोनामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. त्यामुळेच अमेरिकेची लष्करी तयारीही तितकीशी सशक्त नाहीय. म्हणूनच अशापद्धतीने पॅसिफिक महासागरामध्ये युद्धनौका तैनात करुन अमेरिका आपली तयारी दाखवून देण्याचा प्रयत्न करत असून याकडे चुकीच्या पद्धतीने पाहिजे जावू नये असे संकेत दिले जात आहेत, असं मत व्यक्त केलं. अमेरिका आपल्याला युद्धासाठी आव्हान देत आहे किंवा अमेरिकेमध्ये करोनामुळे अस्थिरता निर्माण झाल्याचे हे संकेत आहेत अशापद्धतीने चीन या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करेल, असंही ग्लेजर यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने ते चीनवर यासंदर्भात आगपाखड करत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. अमेरिकेने मागील काही आठवड्यांमध्ये चीनसंबंधित अनेक गोष्टींवर बंदी घातली आहे. यामध्ये अगदी चीनी कंपन्या, चीनमधील विद्यार्थी, चीनीशी संबंधित संशोधन यावर बंदी घालण्यात आली आहे. चीन हा आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतो असं पॅण्टागॉनमधील सुरक्षा तज्ज्ञांचे आणि अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पॅसिफिक महासागारामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासंदर्भातील तयारी करण्याबद्दलचे काम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिका नेहमीच भारताबरोबर 
भारत आणि चीन यांच्यातील तणाव हा दिवसेंदिवस वाढतंच आहे. त्यात दोन्ही देशांनी आपापल्या नियंत्रण रेषेवर आपले सैन्य तैनात केले असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या फेर्‍या सुरु आहेत. अशातच चीनबरोबरच्या सीमातणावाच्या बाबतीत अमेरिका नेहमीच भारताबरोबर असल्याचे अमेरिकेच्या माजी प्रिंसिपल डिप्टी असिस्टेंट सेक्रेटरी एलिस जी वेल्स यांनी म्हंटले आहे.