Breaking News

पाकच्या नापाक हरकती सुरुच ; एक जवान शहीद

दहशतवाद्यांकडून सीमारेषेवर गोळीबारासह तोफगोळयांचा मारा
श्रीनगर ः जगभरात कोरोनाचा कहर सुरु असतांनाच, पाकिस्तानच्या सीमारेषेवर नापाक हरकती सुरुच आहे.  जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तसेच गोळीबारासह मोठया प्रमाणावर तोफगोळयांचा मारा करण्यात आला. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.
राजौरी आणि पुँछ जिल्ह्यातील तारकुंडी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून मोठया प्रमाणावर गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून झालेला गोळीबार आणि तोफगोळयांच्या मार्‍याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले अशी माहिती संरक्षण अधिकार्‍याने दिली. पाकिस्तानने केलेल्या तोफगोळयांच्या मार्‍यामध्ये राजधानी गावातील नयामतुल्ला (35) हा नागरिक जखमी झाला. या नागरिकाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या प्रकृतीला कुठलाही धोका नाही असे राजौरी जिल्हायेच पोलीस अधीक्षक चंदन कोहली यांनी सांगितले. त्याशिवाय मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात गुरुवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु झाली. बडगामच्या पठानपोरा गावामध्ये दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हे ऑपरेशन सुरु झाले. रविवारपासून काश्मीरमधील हे चौथे एन्काऊंटर आहे. जवळपास 6 सहा महिन्यांच्या कालावधीत सुरक्षा दलाने 93 दहशतवाद्यांना कंठस्थान कंठस्नान घालून मोठं यश मिळवले आहे. या दहशतवाद्यांमध्ये टॉप लीडर असलेल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एकत्र येत जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. नियंत्रण रेषा आणि दुर्गम भागात दहशतवादविरोधी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांविरोधात मोहीम उभारली आहे. आगामी काळात दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असता काश्मीर खोर्‍यात चकमकींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.