Breaking News

पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री ठाकरेंशी साधणार संवाद

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, भारत कोरोनाबाधित संख्येच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाखांच्या पार गेला आहे. दिल्ली, महाराष्ट्रात तर कोरोनाने उद्रेक केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. या वेळेसचा मोदींचा मुख्यमंत्र्यांशी संवाद दोन टप्प्यांमध्ये असेल. 16 आणि 17 जून रोजी दुपारी 3 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. असे पत्रात नमूद आहे. दरम्यान, 17 जूनच्या टप्प्यात ते मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधतील. अनलॉक-1 देशात सुरू आहे. कोरोनाचे रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ते मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. अनलॉकनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची समीक्षा या बैठकीत होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त राज्यांमधील परिस्थिती सुधारण्याकरिता काही सूचनाही करण्यात येऊ शकतात.