Breaking News

जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची ब्राझिलची धमकी

नवी दिल्ली ः जगभरात पसरलेल्या कोरोनानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या कामकाजांवर आणि भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होतांना दिसून येत आहे. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेची आर्थिक रसद बंद केल्यानंतर आता ब्राझीलनेही संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे.
जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशातच अमेरिकेनंतर ब्राझिलमध्येही बाधितांची संख्या सर्वाधित आहे. अमेरिकेनंतर आता ब्राझिलनेही जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. ब्राझिलने संघटनेवर पक्षपातीपणाचा आणि राजकारण केल्याचा आरोप केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पक्षपाती करणे सोडले नाही तर, ब्राझिल या संघटनेतून बाहेर पडण्यावर विचार करेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष झायर बोल्सोनारो यांनी दिला. लॅटिन अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिकसह पश्‍चिम आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये करोना धोका अधिक वाढत आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गरेट हॅरिस यांनी दिली होती. लॅटिन अमेरिकेसहित आफ्रिकन देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी युरोपीय देश मात्र यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आले आहेत. फिनलँडमध्येही करोनाचा प्रादुर्भाव जवळपास संपला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंमध्येही 14 दिवसांपासून कोणताही नवा रुग्ण सापडला नाही. तर इटली, स्पेन आणि ब्रिटनमधून वाढणारी रुग्ण संख्याही कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे.