Breaking News

संतांचे पालखी साहळे पंढरपूरकडे रवाना

पुणे/ प्रतिनिधी 
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान झाल्यानंतर शनिवारी संत ज्ञानेश्‍वरांच्या पालखी सोहळ्यानेही प्रस्थान ठेवले. कोरोनाचे संकट असल्याने परंपरागत पद्धतीने पण मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करुन हे सोहळे प्रस्थानकर्ते झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पायी वारीचा सोहळा न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षाची परंपरा कोरोना संकटामुळे मोडीत निघाली.
आषाढी वारीवर कोरोना विषाणूचे सावट असल्याने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान आळंदीतील माऊलींच्या समाधी मंदिरातून झाले. तर शुक्रवारी औरंगाबादमधून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे देखील प्रस्थान झालेहोते. पैठणमध्ये अवघ्या 20 जणांना या सोहळ्यात सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली.
---------------