Breaking News

नेवासा फाटा येथे पोलिस चौकीचे भूमिपूजन

नेवासाफाटा/प्रतिनिधी : गेले अनेक वर्षापासून व्यापारी आणि ग्रामस्थांची मागणी असूनही प्रलंबित असलेला पोलिस चौकी बाबतचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. या ठिकाणच्या राजमुद्रा चौक येथे पोलिस चौकीचे भूमिपूजन पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित डेरे यांच्या हस्ते करण्यात आले.  नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित डेरे, मुकिंदपूरचे सरपंच सतिश निपुन्गे, पोलिस पाटील आदेश साठे, सर्व व्यापारी,ग्रामस्थ यांच्यात सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. घेऊन पार पडला व सायंकाळी 6 वाजता भूमिपूजनही पार पडले. लोकवर्गणीतून पोलिस चौकी बांधायचे निश्‍चित करण्यात आले.
नेवासा शहराप्रमाणे नेवासा फाटा परिसरही आता कायमच गजबजलेला असतो. त्यामुळे चोर्‍याच आणि गुन्हेगारीच प्रमाणही तेवढ्याच पटीत वाढत चालले आहे. येथे व्यवसाय करीत असलेल्या हॉटेल चालक आणि व्यावसायिकांना अनेक वर्षापासून दारुडे आणि दमदाटी करणार्‍यांचा त्रास होत होता. पण कुठल्याच प्रकारची एकी आणि संघटना नसल्याकारणाने त्याकडे दुर्लक्ष केले जायचे, नेमके हेच डोळ्यासमोर ठेवून सरपंच दादा निपुंगे आणि  आदेश साठे यांनी पुढाकार घेऊन पोलिस प्रशासन आणि व्यापारी यांची बैठक घेऊन व्यापारी महासंघाची स्थापना करून सात जणांची कोअर कमिटी स्थापन केली. यात  माऊली सिन्नरकर ,प्रताप (गोटू )हांडे ,दत्तात्रय शिरसाठ ,कपिल बांगर ,बंटी जाधव ,पप्पू निमसे ,अनिल परदेशी यांचा समावेश आहे. 
यावेळी पो .नि.रणजित डेरे यांनी सर्व व्यापार्‍यांना आपला मोबाईल नंबर दिला. तसेच  कुठल्याही प्रकारचा त्रास व्यापार्‍यांना झाल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी आणि सरपंच दादा निपुंगे आणि पोलिस पाटील आदेश साठे यांनी केले.