Breaking News

पडळकरांचे विधान चुकीचे; वातावरण तापताच फडणवीसांनी हात झटकले!

" राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. याबाबत मी गोपीचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. भावनेच्या भारात आपण हे विधान केल्याचे पडळकर यांनी मान्य केले आहे." 

मुंबई/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे विधान भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी पंढरपूर येथे केले होते. या विधानामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, माजी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांच्या या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पडळकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. याबाबत मी गोपीचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. भावनेच्या भारात आपण हे विधान केल्याचे पडळकर यांनी मान्य केले आहे. याबाबत ते लवकरच स्पष्टीकरण देतील.