Breaking News

सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला


- एक जवान शहीद, तिघे जखमी 
- तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश

श्रीनगर/ वृत्तसंस्था
दक्षिण काश्मीरच्या बिजबेहरा भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना आपले लक्ष्य करत हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद जवान झाला असून, तिघे जखमी झालेत. तर, एका स्थानिक मुलाचाही मृत्यू झाला आहे. दुपारपर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले होते.