Breaking News

अपयशानंतरही चार वेळा लॉकडाऊनचा वेडेपणा

नवी दिल्ली ः देशातील कोरोना रुग्णांच्या संख्या नियंत्रित आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला. पहिला लॉकडाऊन अपयशी ठरल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा लॉकडाऊन, असे चार लॉकडाऊन करण्यात आले. तरी देखील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात अपयश आल्याची घणाघाती टीका काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली. 
राहुल गांधी यांनी सरकारने लागू केलेल्या चारही लॉकडाउनचे आलेखही ट्विट केले आहेत. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन करण्या
चा निर्णय घेतला होता. पहिल्या लॉकडाउनच्या काळात कोरोनाच्या टेस्ट वाढवण्यात याव्यात अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. त्याचबरोबर जास्तीत जास्त टेस्टिंग करणे महत्त्वाचे आहे. लॉकडाउनने कोरोना थांबवता येणार नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली होती. सध्या केंद्र सरकारने लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली असून, देशातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. वाढणार्‍या संख्येवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यात राहुल यांनी चार लॉकडाउनविषयीचे आलेख ट्विट केलं आहे. त्याचबरोबर वेडेपणा इतका की, तिच तिच गोष्ट सारखी करतायेत आणि वेगळ्या निकालाची अपेक्षा ठेवतात -अज्ञात असे वाक्य पोस्ट करत राहुल गांधी यांनी सरकारने घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी आलेख शेअर करून सरकारला लक्ष्य केले होते. राहुल गांधी यांनी स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख ट्विट केला होता. या राष्ट्रांमध्ये संख्या वाढत असताना लॉकडाउन लागू करण्यात आला. मात्र, लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संख्या कमी होताना दिसत असल्याचे आलेखामधून दिसत होते. भारतात रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाउन हटवण्यात आला आहे. असे या आलेखातून राहुल गांधी यांनी लक्ष वेधलं होते.