Breaking News

भारत-नेपाळचे नाते कुणीही तोडू शकत नाही ः राजनाथ सिंह

नवी दिल्ली ः भारत आणि नेपाळ यांच्यात असाधारण संबंध आहेत. आमच्यामध्ये रोटी-बेटीचे संबंध आहेत आणि जगातील कोणतीही शक्ती तोडू शकत नाही. सीमेवर किती तारा लावल्या गेल्या तरी आपले नाते कायम अतूट राहील, असा विश्‍वास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. 
देशात कोरोनाचे महाभयंकर संकट आहे. त्याला थोपवण्यासाठी मोदी सरकारही प्रयत्नशील आहे. तिकडे सीमेवर चीनकडून आगळीक सुरू आहे. त्यालाही मोदी सरकारने योग्य प्रकारे सामोरे जात आहे. विशेष म्हणजे अशा काळात नेपाळही भारताची डोकेदुखी वाढवली आहे. चीनच्या नादी लागून नेपाळही भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच परिस्थितीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-नेपाळचे नाते कुणीही तोडू शकत नसल्याचे वक्तव्य केले आहे. कोरोनामुळे बर्‍याच विकसित देशांचे वाईट परिणाम झाले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उत्तराखंड जनसंवाद येथे जनतेला संबोधित करताना बोलत होते. आपल्या आभासी संवादात ते म्हणाले की, कोरोना साथीला थोपवण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचे केवळ भारतानेच नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले आहे. तसेच राजनाथ सिंह हे नेपाळशी भारताचे असलेल्या संबंधांवरही बोलले आहेत. ते म्हणाले की, प्रथम यात्रेकरूंना मानसरोवरच्या दर्शनासाठी नाथूल पास मार्गावरून जावे लागत होते. ते खूप लांब होते, परंतु आता सीमा रस्ता संघटनेने लिपुलेखला जोडण्याचा मार्ग बनविला आहे. त्यामुळे मानसरोवर यात्रेसाठी नवीन मार्ग तयार केला आहे. हा 80 किमी लांबीचा रस्ता आहे, जो भारतीय क्षेत्रात बनलेला आहे. नेपाळला जर या मार्गाविषयी काही गैरसमज झाले असतील, तर ते संवादाद्वारे सोडविले जातील. ते म्हणाले की संरक्षण करारात भारत स्वयंपूर्ण राहील. भारत संरक्षण उपकरणांची केवळ निर्मिती करणार नाहीत, तर निर्यातही करेल.  2024 पर्यंत संरक्षण क्षेत्राच्या निर्यातीला पाच दशलक्ष डॉलर्सचे लक्ष्य ठेवले गेले असल्याचे देखील राजनाथ सिंह म्हणाले.