Breaking News

नाभिक समाजाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या ः अ‍ॅड. आंबेडकर

पुणे : केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील केला असून आता सर्वच दुकानांना उघडण्याची  परवानगी दिली आहे.  मात्र केस कर्तनालयाच्या (सलून) दुकानांना उघडण्याची परवानगी न देऊन या सरकारने नाभिक समाजावर अन्याय केला आहे. तेव्हा लवकरात लवकर केस कर्तनालयाच्या दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. कोरोनामुळे गेले अनेक दिवस दे
शात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे हातावर पोट असणार्‍या गरीब, मजूर, नाका कामगार, घरकाम करणारे कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. 80 दिवसानंतर केंद्र आणि राज्य सरकारने लॉक डाऊन शिथील करून हॉटेल, मॉल तसेच इतर दुकानांना उघडण्याची परवानगी दिली. मात्र यामध्ये केस कर्तनालयाच्या दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे नाभिक समाजावर हा अन्याय असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिवसभर काम केल्यावरच पैसा मिळवणारा नाभिक समाज हा रोजंदारी सारखाच काम करणारा वर्ग आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात दुकाने बंद राहिल्याने त्यांनीही अनेक हालअपेष्टा काढल्या आहेत. त्यामुळे आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने त्यांच्यावर अन्याय न करता, त्यांना केस कर्तनालयाची दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची यावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.