Breaking News

पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग!



- दिल्लीत पेट्रोल 79.76 रुपये तर डिझेल 79.88 रुपये प्रतिलीटर
- महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेल समान पातळीवर

नवी दिल्ली/प्रतिनिधी
देशभरात बुधवारी पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरात 17 पैसे ते 20 पैसे अशी वाढ झाली असून डिझेलच्या दरात 47 ते 55 पैसे अशी वाढ झाली. महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर हा 86.85 रुपये तर डिझेलचा दर 77.49 रुपये इतका झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. देशातील ही पहिलीच घटना आहे.
बुधवारच्या दरवाढीनुसार, देशातील महानगरांमधील अशी दरवाढ झाली आहे.दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर 79.76 रुपये प्रतिलीटर आहे तर डिझेल 79.88 रुपये प्रतिलीटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोल 86.54 तर डिझेल 77.76 रुपये प्रतिलीटर आहे. चेन्नई पेट्रोल 83.04 तर डिझेल 76.77, कोलकातामध्येपेट्रोल 81.45 तर डिझेल 74.63 रुपये प्रतिलीटर मिळत आहे.
----
महत्वाच्या शहरांमधील पेट्रोलचा दर
मुंबई - (पेट्रोल - 86.54, डिझेल- 77.76)
नागपूर - (पेट्रोल - 87.05, डिझेल- 78.31)
पुणे - (पेट्रोल - 86.26, डिझेल- 76.32)
नाशिक - (पेट्रोल - 86.90, डिझेल- 76.94)
औरंगाबाद - (पेट्रोल - 87.62, डिझेल- 78.85)
------------------------