Breaking News

कोविड योद्धा पत्रकारांचा श्रीगोंद्यात गौरव

कोळगाव/प्रतिनिधी : कोरोनाच्या लढ्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान येथील अग्निपंख फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आला. माजी आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पत्रकारांना माऊली महाराज सुडगे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  ज्येष्ठ नेते प्रा.तुकाराम दरेकर अध्यक्षस्थानी होते.
श्रीगोंदयातील पत्रकारांनी कोरोनाबाबत व लॉकडाऊन संदर्भात वार्तांकन करताना स्वतःचा जीव धोक्यात घालून सामाजिक जागृती केली.त्यांना सन्मानित करण्यामागे कृतज्ञता व्यक्त करण्याचा अन सकारात्मक भूमिका घेणार्‍या माध्यमकर्मीचे ऋण व्यक्त करण्याचा उद्देश असल्याचे प्रतिपादन ’अग्निपंख’चे  बी.बी.गोरे यांनी केले.माऊली महाराज सुडगे म्हणाले,करोना काय आहे,तो किती घातक आहे,त्या बाबत कशी काळजी घ्यावी याचे  माध्यमांनी लोकशिक्षण दिले.शिवाय लॉकडाऊन काळात जनतेच्या हाल अपेष्टा मांडल्या.स्थलातरितांच्या वेदनावर फुंकर घातली.अनेक पीडितांच्या जीवनात हास्य फुलविले.प्रशासन व पोलीस अन आरोग्य विभागाने जेवढे कार्य केले,पत्रकारांचे कार्य त्यांच्या पेक्षा तसुभर कमी नाही.
प्रा. तुकाराम दरेकर म्हणाले, सगळ्याचे प्रश्‍न मांडणार्‍या पत्रकारांचेच अनेक प्रश्‍न आहेत.ते सरकारी दरबारी मांडण्याचे काम आपण करू.आरोग्य विमा,जीवन विमा,याबरोबरच त्यांचे मानधन,निवृत्तिवेतन अन पत्रकारभवन आदी बाबत आपण सरकारकडे पाठपुरावा करू.करोनाची काळजी घेण्या बरोबरच त्याचा सामना करण्याचे धौर्य आता अंगी बाळगावे लागेल.पळ काढून चालणार नाही.मदन गडदे यांनी सूत्रसंचालन केले.उत्तम राऊत,आरिफ शेख,गणेश जेवरे, शकील शेख यांनी मनोगत व्यक्त केले.नुकतेच निधन झालेले येथील पत्रकार भरत दरेकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.  टाकळीलोणार येथील गुरूप्रीत या वारकरी शिक्षण देणार्‍या संस्थेला अग्निपंख च्या वतीने पाच हजाराची मदत देण्यात येणार आहे.