Breaking News

दूध दराच्या प्रश्‍नावर रासपचे तहसीलदारांना निवेदन

कर्जत/प्रतिनिधी : सध्या दुधाचे दर कमालीचे घटल्याने पशुपालन व्यवसाय अडचणीत आला आहे. या प्रश्‍नावर राष्ट्रीय समाज पक्षाने लक्ष वेधले आहे. दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी कर्जत रासपच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याद्वारे त्यांनी दूध उत्पादकांच्या व्यथा मांडल्या आहेत. रासपचे नेते भानुदास हाके, रमेश व्हरकटे, भरत लांबोर संतोष कानडे, राजेंद्र शिंदे, संदीप कडू, गणेश शेळके, हरिभाऊ सुळ, सर्जेराव सुळ, भाऊसाहेब सुद्रिक, मनोज गलांडे, वसंत केसकर, श्रीराम देवकाते यांनी हे निवेदन दिले. तीन महिन्यापूर्वी सुमारे पस्तीस रुपये असलेला दर आता वीस रुपयावर आला आहे. पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती, चार्‍याची टंचाई, जनावरांच्या औषधोपचार खर्च या सर्वांमुळे दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. पशुपालकांच्या या प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार करून दूध दरात वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.