Breaking News

राजधानीत कोरोना चाचण्या तिप्पट करणार ः अमित शाह

नवी दिल्ली :  दिल्लीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येत्या दोन दिवसांत कोरोनाची चाचणी दोनपटीने वाढविण्यात येईल आणि 6 दिवसांनंतर ही चाचणी तीन पटीने केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दिली. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या संसर्ग आणि प्रभावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात रविवारी उपाययोजना करण्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी शहा बोलत होते.
दिल्लीत कोरोनाच्या रुग्णासाठी खाटांची कमतरता लक्षात घेता मोदी सरकारने त्वरित 500 रेल्वे कोच दिल्लीस देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिल्लीत 8000 खाटा वाढतील तसेच कोरोनाशी लढण्यासाठी सर्व आरोग्य सुविधा परिपूर्ण होतील. दिल्लीत प्रतिबंधीत क्षेत्रात संसर्ग संपर्क-शोध अभियान उत्तम प्रकारे करण्यासाठी  घरोघरी जाऊन प्रत्तेक व्यक्तीचे   व्यापक स्वास्थ्य सर्वेक्षण केले जाईल तसेच यासंबंधी एका आठवड्यात अहवाल समोर येईल. तसेच याकडे चांगल्या प्रकारे लक्ष ठेवण्यासाठी प्रत्त्येक व्यक्तीस आरोग्य सेतु अप्लिकेशन वापरण्यास सांगितले आहे.   दिल्लीत संसर्ग रोखण्यासाठी येत्या दोन दिवसात कोरोना चाचणी वाढवून पहिले दुप्पट आणि सहा दिवसानंतर तिप्पट करण्यात येईल. त्यासोबतच प्रतिबंधीत क्षेत्रात प्रत्तेक मतदान केंद्र पातळीवर चाचणीची व्यवस्था करण्यात येईल. दिल्लीच्या लहान रुग्णालयात कोरोनासाठी योग्य माहिती आणि निर्देश देण्यासाठी मोदी सरकारने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानात दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन उपलब्ध कार्णून दिले आहे. यासाठी जेष्ठ डॉक्टरांची एक समित्ती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांच्या देखरेखीत सर्वश्रेष्ठ प्रणालीचा वापर केला जाईल संबंधित सहायता कक्षाचा क्रमांक सोमवार 15 जून रोजी जाहीर होईल.   दिल्लीच्या खासगी रुग्णालयांना कोरोनाआर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या खाटांपैकी 60% कमी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कोरोना चाचणीचे शुल्क निर्धारित करण्यासाठी डॉ. पॉल यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली आहे. ही समिती सोमवारी अहवाल साधार करणार आहे. भारत कोरोनाशी खंबीरपणे लढतो आहे. या संकट काळात ज्यांनी आपले प्राण गमाविले त्यासाठी सरकारला वेदना आणि दु:ख आहे तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी सरकार संवेदनशील आहे. सरकार ने अंत्यसंस्कार विधीसाठी नवीन दिशा-निर्देश जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.  ज्यामुळे अंत्य संस्कार विधीसाठी कमी वाट पहावी  लागेल. मोदीजींच्या नेतृत्त्वात देश कोरोनाशी सतर्क आणि सहभागिता भाव ठेवून  लढतो आहे. अनेक स्वयंसेवी संस्था खूप  उत्कृष्ट कार्य करीत आहेत. याच सरकारने स्काऊट गाईड, एनसीसी, एनएसएस आणि स्वयंसेवी संस्था आरोग्य सेवांमध्ये स्वयंसेवक म्हणून कार्य करीत आहेत. केंद्र सरकारने दिल्लीत  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी  तसेच या संकटास मजबूतीने  लढा देण्यासाठी  दिल्ली सरकारला  भारत सरकारचे  पाच  जेष्ठ अधिकारी देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रमुख निर्ण्यांसोबत केंद्र व दिल्ली सरकारच्या आरोग्य विभाग तसेच संबंधित विभाग आणि विषय प्रमुख तसेच तज्ञ लोकांना बैठीकीत झालेल्या निर्णयाची वास्तविक स्वरूपात तळागाळा पर्यंत अंमल बजावणी सुनिश्‍चित करण्याचे  निर्देश देण्यात आले आहे. भारत सरकारने दिल्ली सरकारला  कोरोना महामारीशी लढण्यासाठी आवश्यक संसाधन जसे ऑक्सीजन सिलिंडर, वेंटीलेटर, पल्स ऑक्सीमीटर आणि अन्य आवश्यकता पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिली.