Breaking News

राजधानीत सामूहिक संसर्गाचा धोका!

चार व्यक्तीमागे एक पॉझिटिव्ह
31 जुलैपर्यंत साडेपाच लाख रुग्ण वाढतील ; सिसोदिया यांचा इशारा
दिल्लीत केवळ स्थानिकांवर उपचार करण्याचा निर्णय राज्यपालांकडून रद्द 
नवी दिल्ली ः राजधानीत कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले असून, सोमवारी केलेल्या एकूण टेस्टपैकी 27 टक्के नागरिक कोरोनाबाधित सापडल्यामुळे खळबख उडाली आहे. याबरोबर कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 30 हजारांवर गेला आहे. एवढेच नाही तर दिल्लीतील आणखी एक आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. दिल्लीच्या दर चार नागरिकांमागे एक कोरोना रुग्ण सापडू लागला आहे.
राजधानी दिल्लीत पुढच्या काळात कोरोनामुळे भयंकर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्लीत 31 जुलैपर्यंत साडे पाच लाख करोना रुग्ण होतील, असा इशारा उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिला आहे. दिल्लीत सामूहिक संसर्ग नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. पण दिल्लीत सामूहिक संसर्गला सुरुवात झाली आहे, असे दिल्ली सरकारचे म्हणणे असल्याचे सिसोदिया म्हणाले.
15 जूनपर्यंत दिल्लीत करोना रुग्णांची संख्या ही 44 हजारापर्यंत जाऊ शकते. हा आकडा 30 जूनपर्यंत वाढून 1 लाखपर्यंत जाऊ शकतो. आणि 15 जुलैपर्यंत दिल्लीत कोरोनाचे सव्वा लाख रुग्ण असतील. तर 31 जुलैपर्यंत ही संख्या साडेपाच लाखांवर जाईल, असे सिसोदिया म्हणाले. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार झाले पाहिजे. पण दिल्ली सरकारचा हा निर्णय नायब राज्यपालांनी रद्द केला. यामुळे दिल्लीकरांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. आम्ही राज्यपाल अनिल बैजल यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह केला. पण त्यांनी नकार दिला, असे सिसोदिया यांनी सांगितले. दिलीत गेल्या 24 तासांत 3700 जणांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात 1007 जण पॉझिटिव्ह आढळून आले. म्हणजेच एकूण चाचण्यांपैकी 27 टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळलेत. गेल्या आठवड्यात हा दर 26 टक्के इतका होता. दिल्लीत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29,943 इतकी झाली आहे. यापैकी 11, 357 जण कोरोनामुक्त झालेत. तर 17, 712 जणांवर उपचार सुरू आहे. दिल्लीत आता सामूहिक संसर्गाचा धोका वाढला आहे. दिल्लीत सामूहिक संसर्ग सुरू झाला आहे. असे अनेक जण आहेत ज्यांचा कुठलाही सोर्स नाहीए. जे कुणाच्या संपर्कात आलेले नाहीत. आता केंद्र सरकारने ही बाब मान्य करायला हवी आहे. दिल्लीतील जवळपास निम्म्या रुग्णांचा कुठलाही सोर्स आढळून आलेला नाही, असं एम्सचे संचालकांनी सांगितल्याचं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले. दिल्लीत करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करोनाचे हॉटस्पॉटही वाढत आहेत. दिल्लीतील करोनाच्या हॉटस्पॉटची संख्या वाढून 183 इतकी झाली आहे.  यामुळे दिल्लीच्या राज्यपालांनी सर्वपक्षीयांची तातडीची बैठक बोलावली आहे. राजधानी दिल्लीला आता कोरोनाने चांगलाच वेढा घातला असून या महामारीने चांगलेच हातपाय पसरले आहेत.