Breaking News

कलाशिक्षक सरोदे यांचे कोरोनाबाबत रेखाचित्र

भाविनिमगाव/प्रतिनिधी : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी गावचे रहिवासी असलेले व पाथर्डी येथील एम. एम.निर्‍हाळी विद्यालयामध्ये कार्यरत असलेले कलाशिक्षक गणेश सरोदे यांनी कोरोना लॉकडाऊन व नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरलेला शेतकरी आणि नुकतेच झालेले निसर्ग वादळी प्रकोप या सद्यस्थितीतील घटनेवर आपल्या रेखाचित्रातुन प्रकाश टाकला आहे.
एकाच रेखाचित्रातून तीन महत्त्वाच्या विषयावर एकत्र रेखाचित्र लॉकडाऊन कालावधीमध्ये त्यांनी  साकारले असून आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. सरोदे यांना आत्तापर्यंत विभागीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी साकारलेल्या रेखाचित्रास मोठा प्रतिसाद मिळाला.