Breaking News

पाकमध्ये भारतीय दूतावासातील दोन अधिकारी बेपत्ता

इस्लामाबाद : पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लघंन होत असल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असतांना, पाकिस्तानमधील भारतीय दूतावासातील दोन अधिकारी बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या अधिकार्‍यांचा शोध सुरू आहे. भारताने पाकिस्तान सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दोन गुप्तहेरांना भारतीय तपास यंत्रणांनी अटक केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासाचे कार्यालय असून, येथून दोन्ही अधिकारी बेपत्ता झाले आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पाकिस्तानकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. भारताने 31 मे रोजी पाकिस्तानी उच्चायोगातील दोन कर्मचार्‍यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. चोरलेल्या दस्तावेजांची देवाणघेवाण करताना पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचार्‍यांना रविवारी अटक करण्यात आली होती. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही मोठी कारवाई केली होती. अबिद हुसैन, ताहीर खान आणि जावेद हुसैन अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नाव होती. ते थेट आयएसआयच्या संपर्कात होते. आयएसआय पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश दिला होता.  यापूर्वी 2016 साली पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकार्‍याची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील अधिकार्‍याचा पाठलाग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. भारतीय अधिकार्‍याने बनवलेल्या व्हिडीओमध्ये एक बाईकस्वार त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे दिसत होता. तसेच अहलुवालिया यांच्या घराबाहेर एक कार आणि बाईकस्वार उभा असल्याचं दिसत त्या व्हिडीओत दिसत होतं.