Breaking News

देशापेक्षाही चारपट जळगावचा मृत्यूदर !

एका महिन्यात कोरोनामुळे 112 जणांचा मृत्यू 
जळगाव ः राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पुणे आणि मुंबईत आढळून येत असले तरी, कोरानामुळे मृत्यू होणाचा सर्वाधिक जळगाव जिल्ह्यात असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनामुळे देशात होणार्‍या मृत्यूदरापेक्षा जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर चारपट अधिक आहे. मागील 30 दिवसांच्या कालावधीत तब्बल 112 जणांचा संसर्ग झा
ल्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काही संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. तीन जून रोजी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी 22 जणांचे स्वॅब गहाळ झाल्याचं समोर आलं. जिल्हा शल्यचिकित्सकांनी राज्य सरकारला याची माहिती दिली. धुळे येथील प्रयोगशाळेत हे स्वॅब हरवले असून, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.
देशात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांचे प्रमाण अर्थात मृत्यूदर 2.8 टक्के इतका आहे. तर जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर आहे. 12.3 टक्के. झोप उडवणारी स्थिती जळगाव जिल्ह्यात आहे. मुंबईपासून 400 किमी अंतरावर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर आणि पाचोरा या चार शहरात 4 जून पर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला आहे. जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी महिनाभरापूर्वीच याविषयी धोक्याचा इशारा दिला होता. त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 42 होता. तर 14 जणांचा मृत्यू झाला होता. केवळ पाच दिवसात 14 जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पुढील 30 दिवसांच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक जणांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. मृतांपैकी 60 जणांचं वय 60 पेक्षा अधिक होत. 47 जण 50 ते 60 या वयोगटातील होते. तर 5 जण 40 ते 50 वयोगटातील होत्या. या मृत्यूमुळे जिल्ह्याचा मृत्यूदर एका महिन्याच्या काळात देशातील मृत्यूदरापेक्षा चारपट अधिक झाला आहे. राज्य सरकारने आता प्रत्येक व्यक्तीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी 10 सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे.