Breaking News

संपूर्ण येळपणे गाव कंन्टोमेंट झोन घोषित

- गावात भिवंडीहून आला कोरोना
- परिसरात सर्वेक्षण मोहीम राबविणार

प्रमोद आहेर/ येळपणे
श्रीगोंदा तालुक्यातील एळपणे येथे भिवंडी वरून आलेले नवीन तीन व्यक्तीना कोरोना विषाणू ची लागण झालेली आहे त्यामुळे एळपणे हे संपूर्ण गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र containment zone घोषित करण्यात आला आहे, त्यानुसार सदर क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान करणे व सदर क्षेत्रातून वाहनांचे आवागमन यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.

सदर क्षेत्रातील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता 27/6/20 रोजी दुपारपासून  ते दि 10/7/20 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

1 प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, वैद्यकीय सुविधा यासाठी डॉ राहुल धोत्रे व डॉ रुपाली सिदणकर अधिक्षक यांची जबाबदारी नोडल प्रतिनिधी म्हणून असेल, सदर परिसरातील सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे2 सदर प्रतिबंधित क्षेत्रासाठी पोलिस बंदोबस्त पोलीस निरीक्षक बेळवंडी यांच्यामार्फत असणार आहे3 सदर प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती याना आपत्कालीन परिस्थितीत आत किंवा बाहेर जायचे असल्यास त्याचे अधिकार पोलिस निरीक्षक बेलवंडी यांना असतील 4 सदर परिसरात बेरेकेटिंग तसेच अत्यावश्यक सेवेचे सर्व नियोजन सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत येळपणे यांची जबाबदारी असेल
सदरचे आदेश हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार देण्यात आले आहेत.

 श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नागरिकांना पुन्हा विनंती आहे की आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.अशी विनंती तहसीलदार महेंद्र माळी ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर ,बेलवंडी पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी केली.
       यावेळी येळपणे गावचे  सरपंच सौ. आशाताई नितनवरे, उपसरपंच गणेश पवार ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार,  सतीश शेठ धावडे ,विठ्ठल हुलसर ,राजेश सांगळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष आबा पाटील पवार तलाठी भामरे भाऊसाहेब ,झाडे भाऊसाहेब, शरद सोनवणे, पोलीस पाटील बापूराव सुंदर नितनवरे ,अमोल पवार ,पप्पू थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी सुनिल कोळपे निलेश हुलसर आदी उपस्थित होते.