Breaking News

नियम शिथील करण्यासाठी उद्रेक

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांवर दगडफेक 
पुणे ः पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील आनंदनगर परिसरात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण आढळल्याने तेथील परिसर सील करण्यात आलेला आहे. मात्र हा परिसरात नियम शिथील करण्यासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर उतरलेल्या संतप्त  नागरिकांनी सर्व राग पोलिसांवर काढल्याच दिसून आले. नागरिकांक
डून  पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर अचानक दगडफेक सुरू झाली. यात काही जणांना मुका मार लागला असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर परिसर हा कंटेनमेंट झोन आहे. परंतु, येथील काही नियम शिथील करा या मागणीसाठी आज शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, यामुळे सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला. काही दिवसांपूर्वीच आनंदनगर परिसरातील शेकडो नागरिक रस्तावर उतरले होते. तेव्हा देखील स्थानिक नगरसेवक, आयुक्त आणि पोलीस प्रशासनाने धाव घेतली होती. नागरिकांचे म्हणणे ऐकून जमाव शांत केला होता. परंतु, आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. बंदोबस्त करत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यानी नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. यात दोन दुचाकी आणि एक चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. तर अनेक पोलिसांना मुका मार लागला आहे.
दरम्यान, पोलिसांची संख्या कमी असल्याने तेथून पोलिसांनी काही वेळासाठी माघार घ्यावी लागली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी आणखी कुमक मागवत गर्दी पांगवली. दुसरीकडे मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला होता.