Breaking News

औरंगाबादला समूह संसर्गाचा धोका कायम !

औरंगाबाद : शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. जुन्या भागांसह नव्या भागांत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. शहर दुसर्‍या टप्प्यातून तिसर्‍या टप्प्यात गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या टप्प्यात समूह संसर्ग होतो आणि शहरात त्याची सुरुवात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरात 15 मार्च रोजी पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे निदान झाले होते, तेव्हा आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. हा रुग्ण परदेशातून शहरात परतलेला होता. 
आरोग्य विभाग, मनपा प्रशासनाने त्याच्या संपर्कातील 600 वर लोकांची तपासणी केली; परंतु कोणीही कोरोनाबाधित आढळून आले नाही. पहिला पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊन घरीही परतला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मात्र, एप्रिलच्या प्रारंभी दोन नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर 5 एप्रिल रोजी एकाच दिवशी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णांसह त्यानंतरच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांना बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे शहर कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यात पोहोचले. त्यानंतर आता एकाच वेळी अनेक रुग्ण आढळत आहेत. शिवाय एका भागापुरता कोरोना मर्यादित राहिला नाही. त्यामुळे तिसर्‍या टप्प्याची सुरुवात झाल्याची भीती आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबाद येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृह हे कडकडीत ’लॉकडाऊन’ करण्यात आले होते़  कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्यासह तुरुंग अधिकारी आणि कर्मचारी हे कारागृहातच कैद्यांबारोबर ’लॉकडाऊन’ होते़ अत्यंत कडेकोट बंदोबस्त आणि वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निगराणीत असताना कारागृहात ’कोरोना’ पोचल्याने अनेकांना धक्का बसला आहे़ ’अंडर ट्रायल’ बंदी असलेल्या आरोपींपैकी 29 कर्मचार्‍यांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला़ यानंतर सर्व कैद्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांना किलेअर्क येथील वसतिगृहात विशेष ’कोविड 19’ उपचार केद्र स्थापन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे़ 29 कैदी बाधित निघाल्यानंतर जेलमधील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे स्वॉब घेण्यातची मोहीम चालविण्यात आली.आतापर्यंत 545 कैद्यांचे स्वॉब घेण्यात आले. त्यापैकी दोन अधिकारी आणि 12 कर्मचारी हे बाधित झाल्याचे तपासणी अहवालावरून समोर आले. यानंतर कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी कैद्यांची रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी आहरात बदल केला आहे़. याशिवय कैदी 65 ते 70 वर्षांचे आहेत. त्यांना स्वातंत्र कक्ष स्थापन करून दिले आहेत़ कारागृहातील सूत्रांच्या माहितीप्रमाणे, जवळपास 200 वयस्कर आहेत़.

कैद्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन
हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील 29 कैद्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर कारागृह प्रशासनाकडून दक्षता पाळली जात आहे़ 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कैद्यांची आरोग्य प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार दिला जात आहे़ हर्सूल कारागृहात सुमारे 200 कैद्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत कारागृहातील चार हजार 611 बंदिवानांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये ’कोरोना’ची लक्षणे आढळलेल्या 545 जणांचे ’स्वॉब’ घेण्यात आले आहेत़, अशी माहिती कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली आहे़.